• यू मुम्बाचा घरच्या मैदानावर पराभव
  • यू मुम्बाचा घरच्या मैदानावर पराभव
SHARE

मुंबईत घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात यू मुम्बा संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. प्रो कबड्डीतील पाचव्या टप्प्यातील हा पहिला सामना वरळीच्या एनएससीआय स्टेडियममध्ये यू-मुम्बा विरुद्ध जयपूर पिंक पॅंथर्स असा रंगला होता. जयपूरचा कर्णधार जसवीर सिंहने शानदार कामगिरी करत संघाला आघाडी मिळवून देत सामन्यावर आपले वर्चस्व राखले. जयपूर संघाने उत्कृष्ट खेळी करत 36-39 अशा फरकाने यू-मुम्बा संघाचा पराभव केला.

उत्तरार्धात मुंबई संघाने आपला शानदार खेळ दाखवत सामना रंगतदार केला. याच दरम्यान, मुंबईच्या नवनीत गौतम आणि जयपूर संघाचा कर्णधार जसवीर यांच्यात खेळावरून खटके उडाले. याचाच फायदा घेत जयपूर संघाने आघाडी घेतली.

सहा सामन्यांतील जयपूर संघाचा हा चौथा विजय ठरला असून हा संघ 22 गुण संख्येने ए झोनमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर सात सामन्यांत मुंबई संघाचा हा चौथा पराभव आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते खेळाचे उद्घाटन करण्यात आले होते. सिने अभिनेता आणि जयपूर पिंक पॅंथर्सचा मालक अभिषेक बच्चन देखील यावेळी उपस्थित होता.


झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांनी लुटला आंनद

प्रो कबड्डीच्या पाचव्या सिझनची सुरुवात शुक्रवारी मुंबईत झाली. या दरम्यान मोठ्या संख्येने कबड्डीप्रेमींनी हजेरी लावली होती. यू-मुम्बाच्या जयघोषाने स्टेडियममध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी सैराट चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर प्रेक्षकांनी ताल धरला.

प्रेक्षाकांची पूर्ण साथ होती आणि त्यामुळेच शेवटच्या क्षणी संघाने जोरदार चढाई केली. सुरुवात थोडी खराब गेली. पण पुढच्या सामन्यात आणखी चांगले खेळू.

अनुप कुमार, कर्णधार, यू मुम्बाहेही वाचा - 

अनुप म्हणतो, मुंबईतच माझे जास्त चाहते

प्रो-कबड्डी म्हणजे छोटा पॅकेट, बडा धमाका!


संबंधित विषय
ताज्या बातम्या