मुंबईच्या 'या' कबड्डीपटूंना पुरस्कार घोषित

  Mumbai
  मुंबईच्या 'या' कबड्डीपटूंना पुरस्कार घोषित
  मुंबई  -  

  यंदाच्या 17 व्या महाराष्ट्र कबड्डी दिनानिमित्त मुंबईच्या कुमार-कुमारी गटात अनिकेत पेवेकर, सुरज दुण्डले (ठाणे) आणि तेजश्री सारंग तर, किशोर मुलांमध्ये ठाण्याच्या महेश भोईर यांना कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांच्या स्मरणार्थ 5000 रुपये शिष्यवृत्ती आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.


  ...या ज्येष्ठ कबड्डीपटूंनाही पुरस्कार घोषित

  वरिष्ठ महिला गटात मुंबइ उपनगरच्या कोमल देवकर यांना अरुणा साटम पुरस्कार आणि 10,000 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. मुंबईचे दत्तात्रय पारकर यांना ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार आणि ज्येष्ठ पंच सुरेश जाधव यांना अमृत कलश पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

  महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ‘कबड्डी महर्षी शंकरराव साळवी’ यांचा जन्मदिन “कबड्डी दिन” म्हणून साजरा केला जोतो. यंदाचा 17 वा कबड्डी दिन हा नाशिक येथे 15 जुलै रोजी होणार आहे.

  कबड्डीत महाराष्ट्राकरीता उल्लेखनीय आणि अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडू, कार्यकर्ता, पंच, संघटना, तसेच खेळाच्या प्रसिद्धीसाठी कार्य करणाऱ्या क्रीडा पत्रकारांचे सत्कार केले जाणार आहे.

  त्याचबरोबर किशोर आणि कुमार गटातील खेळाडूंना बाबाजी जामसांडेकर, मुकुंद अण्णा जाधव आणि कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

  या कार्यक्रमाला विजेत्यांचा सत्कार करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुंबई शहर असोसिएशनचे अध्यक्ष भाई जगताप यांची उपस्थिती राहणार आहे.  हेही वाचा - 

  मुंबईच्या महिला-पुरुष संघाची पुणे कबड्डी स्पर्धेत आगेकूच

  कबड्डी... कबड्डी... कबड्डी...  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.