Advertisement

गणेशोत्सवाच्या दिवशी यू-मुम्बा घेणार झेप


गणेशोत्सवाच्या दिवशी यू-मुम्बा घेणार झेप
SHARES

येत्या 25 ऑगस्टपासून प्रो कबड्डीच्या उर्वरीत सहा लढती मुंबईत होणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळातच मुंबईत यू मुम्बा घरच्या मैदानावर खेळाला सुरुवात करणार आहे. यासाठी यू मुम्बाचा संघ मुंबईत होणाऱ्या सहा लढतीसाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत झालेल्या सहा लढतीत यू मुम्बा संघाने तीन लढती जिंकलेल्या आहे. पण 25 ऑगस्टपासून घरच्या मैदानावर सलग सहा लढत होणार आहेत. यामुळे यू मुम्बाला गुणसंख्या वाढवण्यासाठी चांगली संधी मिळाणार आहे.

गुजरात संघाने घरच्या मैदानावर सर्व लढतीत उत्कृष्ट कामगिरी करत आपला दबदबा दाखवला.


गुजरात संघात नवीन आणि तरुण खेळाडू असल्यामुळे त्यांनी त्या जोरावर विजय मिळवत आपला दबदबा निर्माण केला. येत्या 25 ऑगस्टपासून चालू होणाऱ्या लढतीसाठी आमचा संघ सज्ज आहे आणि नक्कीच त्यात चांगली कामिगरी करू.
- अनुप कुमार, कर्णधार, यू-मम्बा


नितान करणार बाप्पाला मिस

यू-मुम्बामधील आघाडीचा खेळाडू असलेला मराठोळा नितिन मदणे यंदाचा गणेशोस्तव मुकणार असल्याचे दिसत आहे.

आमच्या घरी 11 दिवसाचा गणपती बसतो. त्यामुळे आमच्या घरी उस्ताहाचे वातावरण असते. मोठ्या प्रमाणात पाहुणे मडंळी जमा होतात. यामुळे खूप छान वाटते. पण यावेळी घरचा गणपती मीस करणार. पण गेणाशाकडे मी एकच मागणे करेन, यू मुंम्बाचा विजय झाला पाहिजे आणि विजयी कप आमच्याच हातात येऊदे.

- नितिन मदणे, कबड्डीपटू


हेही वाचा - 

पहिल्याच दिवशी यू-मुम्बाचा पराभव

अनुप म्हणतो, मुंबईतच माझे जास्त चाहते


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा