यू-मुम्बाचं धडाकेबाज 'कमबॅक'

  Mumbai
  यू-मुम्बाचं धडाकेबाज 'कमबॅक'
  मुंबई  -  

  पुणेरी पलटनसोबत झालेल्या प्रो-कबड्डीतील पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर यू-मुम्बा संघाने आता कमबॅक केलं आहे. रविवारी झालेल्या सामन्यात यू-मुम्बाने हरियाणा स्टीलर्सला 29-28 अशा फरकाने पराभूत केले.

  यू-मुम्बा संघातल्या काशिलिंग अडके आणि कर्णधार अनुप कुमार यांनी विजयासाठी मोलाची भूमिका बजावली. हरियाणा स्टीलर्सच्या वाजिर सिंह आणि विकास खांदला यांनी यू-मुम्बाला टक्कर देत खेळाच्या अर्ध्या वेळापर्यंत 15-11 अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर मात्र काशिलिंग अडके याच्या शानदार खेळीमुळे यू-मुम्बाने 19-12 अशी आघाडी घेतली आणि पुन्हा खेळात पुनरागमन करत हरियाणा स्टीलर्सला 29-28 अशा फरकाने मात देत सामना खिशात टाकला.

  याव्यतिरिक्त झालेल्या इतर सामन्यात बंगळुरू बुल्सने तेलुगू टायटन्सला 31-21 अशा फरकाने पराभूत केले.

  यू-मुम्बाचा पुढचा सामना हा दिल्ली दबंगसोबत 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामध्येही यू-मुम्बा संघाने अशीच विजयी कामगिरी करावी अशी अपेक्षा मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे.     हेही वाचा -

  पहिल्याच दिवशी यू-मुम्बाचा पराभव

  प्रो-कबड्डी म्हणजे छोटा पॅकेट, बडा धमाका!


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.