पहिल्याच दिवशी यू-मुम्बाचा पराभव


  • पहिल्याच दिवशी यू-मुम्बाचा पराभव
SHARE

शुक्रवारपासून प्रो कबड्डीला धडाक्यात सुरुवात झाली. पण पहिल्याच दिवशी प्रो कबड्डीमध्ये यु-मुम्बाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबईकरांची निराशा झाली आहे. पुण्याविरुद्ध झालेल्या सामान्यात 21-33 आशा मोठ्या फरकाने यु-मुम्बाला पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्यात बोनस गुणांचा बादशाह समजला जाणारा कर्णधार अनुप कुमारने बोनस गुण घेऊन चांगली सुरुवात केली. पण मुंबईला पुणेकर खेळाडूंसमोर आघाडी मिळवण्यात अपयश आले. त्यांनी शेवटपर्यंत आपली आघाडी राखत विजय आपल्या खिशात टाकला.

पुणे संघाने दहाव्या मिनिटाला मुंबईवर एक लोण चढवून आपले वर्चस्व कायम राखले. यामुळे युमुम्बाच्या संघाचे दडपण वाढले. त्याचाच फायदा पुणे संघाला झाला. मध्यंतरापर्यंत पुणे संघाने 17-10 अशी मोठ्या फरकाने आघाडी घेतली. या रोमांचक लढतीत मुंबई खेळाडूंनी आघाडी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण यश त्यांच्या पदरात आले नाही.

या सामन्यात मध्यंतरानंतर पुणे संघाने पाचव्या मिनिटाला दुसरा लोण करत सामन्यात आपला दबदबा निर्माण केला. या सामन्यात मुंबई संघाचा कर्णधार अनुप कुमारने अष्टपैलू खेळ करत 8 गुण मिळवून दिले. पुणे संघाकडून कर्णधार दीपक हुडा 5 आणि धर्मराज चेरलथान याने 4 गुण घेत संघाला विजय मिळवून दिला.'हा सामना हरलो असलो तरी पुढच्या वेळी चांगले प्रदर्शन करू' अशी प्रतिक्रिया यु-मुम्बाने ट्वीटरवरून दिली आहे.
 हेही वाचा -

प्रो-कबड्डी म्हणजे छोटा पॅकेट, बडा धमाका!

कबड्डी स्पर्धेत आराध्य, शिवनेरीची उपांत्यपूर्व फेरीत


संबंधित विषय
ताज्या बातम्या