Advertisement

सर्वोत्तम चढाईपटूंच्या यादीत यू मुम्बाचा सिद्धार्थ देसाई ५ व्या स्थानावर


सर्वोत्तम चढाईपटूंच्या यादीत यू मुम्बाचा सिद्धार्थ देसाई ५ व्या स्थानावर
SHARES

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वाला सुरुवात झाली असून प्रेक्षकांना सध्या रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. या मागचं कारणं म्हणजे प्रत्येक संघातील खेळाडू आपल्या उत्कृष्ट खेळीनं प्रत्येक खेळाडूला टक्कर देत आहेत. मग ती चढाई असो वा पकड.


अनुभवी खेळाडूंना टक्कर

आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये काही अनोख्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे नवीन खेळाडू अनुभवी खेळाडूंना टक्कर देत चढाईपटूंच्या यादीत आपलं स्थान निर्माण करत आहेत. यामध्ये यू मुम्बा संघाचा सिद्धार्थ देसाई पाचव्या स्थानावर आहे. तर, तामिळ थलायवाज संघाचा अजय ठाकूर पहिल्या स्थानावर आहे.


आतापर्यंतच्या सामन्यांमधील सर्वोत्तम चढाईपटू

  • तामिळ थलायवाज संघाचा अजय ठाकूर याला ५ सामन्यांत ६० गुण मिळाले आहेत.
  • पुणेरी पलटण संघाचा नितीन तोमर याला ४ सामन्यांत ५२ गुण मिळाले आहेत.
  • पाटणा पायरेट्स संघाचा प्रदीप नरवाल याला ३ सामन्यांत ४१ गुण मिळाले आहेत.
  • यूपी योद्धा संघाचा श्रीकांत जाधव याला ४ सामन्यांत ३६ गुण मिळाले आहेत.
  • यू मुम्बा संघाचा सिद्धार्थ देसाई याला ३ सामन्यांत ३६ गुण मिळाले आहेत.हेही वाचा-

अटीतटीच्या लढतीत यू मुम्बाची सरशी!

नाराज 'एमसीआय' 'बीसीसीआय'विरोधात कोर्टात जाणार?संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा