Advertisement

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत यूनियन बँक, मुंबई पोलीस उपांत्यपूर्व फेरीत


राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत यूनियन बँक, मुंबई पोलीस उपांत्यपूर्व फेरीत
SHARES

कुर्ला येथील नेहरू नगर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत पुरुषांमध्ये यूनियन बँक, सेंट्रल बँक, भारत पेट्रोलियम, मुंबई पोलीस, महिंद्रा, मुंबई बंदर, महाराष्ट्र पोलीस अाणि देना बँक या संघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांमध्ये महात्मा गांधी, स्वराज्य, शिव अोम, शिवशक्ती, संघर्ष, अनिकेत, मुंबई पोलीस अाणि नवशक्ती या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत अागेकूच केली.


भारत पेट्रोलियमचे दोन विजय

पुरुषांच्या अ गटात यूनियन बँकेने सेंट्रल बँकेला ३८-२२ असे हरवत बाद फेरी गाठली. यूनियन बँकेकडून प्रतीक किरवे, अजिंक्य पवार, राजेश बेंदूर, नितीन भोगले यांचा तर सेन्ट्रल बँकेकडून सुशांत साईल, आकाश अडसूळ यांचा खेळ छान झाला. ब गटातून भारत पेट्रोलियमने आज दोन विजय मिळवत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्यांनी प्रथम आर के इंजिनिअरिंगचा ३०-१३ असा तर नंतर माझगाव डॉकचा २३-१५ असा पराभव केला. दोन्ही सामन्यात पेट्रोलियमकडून आकाश पिकलमुंडे, रोहन उके, अक्षय बर्डे, नितीन शिंदे यांनी चढाई पकडीचा उत्कृष्ट खेळ केला.


महिलांमध्ये महात्मा गांधीची अागेकूच

महिलांमध्ये महात्मा गांधीने स्वराज्यचा ३०-१६ असा पराभव करीत अ गटातून प्रथम तर स्वराज्यने द्वितीय क्रमांक मिळवत बाद फेरी गाठली. पूजा किणी, तृप्ती सोनावणे, अक्षदा म्हात्रे यांचा खेळ महात्मा गांधींच्या विजयात महत्त्वाचा ठरला. स्वराज्यची श्रुतिका घाडीगावकर एकाकी लढली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा