02/6
![प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' 5 फळे खा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' 5 फळे खा](/build/images/lazy-img-041999fc71.png)
सफरचंद
सफरचंदामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-सिक्स इत्यादीसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. रोग प्रतिकार शक्ती वाढते.
03/6
![प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' 5 फळे खा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' 5 फळे खा](/build/images/lazy-img-041999fc71.png)
डाळिंब
डाळिंब हे एक पावसाळी फळ आहे ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. हे सर्दी आणि फ्लू सारख्या असंख्य संक्रमणास प्रतिबंध करण्यास मदत करते. डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात ज्यामुळे संधिवात रुग्णांना फायदा होतो.
04/6
![प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' 5 फळे खा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' 5 फळे खा](/build/images/lazy-img-041999fc71.png)
प्लम
हे फळ खनिजे आणि पोटॅशियम चा एक चांगला स्रोत आहे जे शरीराला पेशींच्या नुकसानीपासून वाचवते. प्लममध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे त्यांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. व्हिटॅमिन ए आणि सी अधिक प्रमाणात यातून मिळतो. यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते.
05/6
![प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' 5 फळे खा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' 5 फळे खा](/build/images/lazy-img-041999fc71.png)
जांभूळ
पावसाळ्यात जांभळाचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, आर्यन आणि जीवनसत्व आढळतात. यामध्ये असणारे एंटीऑक्सीडंट त्वचेला तजेलदार करण्यास मदत करतात. याशिवाय जांभूळ रक्तशुद्धीचं कामही करतं. मधमेह असणाऱ्या लोकांसाठी जांभूळ अत्यंत फायदेशीर आहे.
06/6
![प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' 5 फळे खा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात 'ही' 5 फळे खा](/build/images/lazy-img-041999fc71.png)
पेरू
हे फळ पावसाळ्यात होणाऱ्या पचनासंबंधीत रोगांना दुर ठेवून पचनप्रक्रियेला मदत करतं. यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पाचक रसांच्या स्त्रावाला वाढण्यास मदत होते. कब्ज, गैस, अपचन अशा पोटासंबंधीच्या समस्या कमी होतात. याशिवाय पेरुमध्ये जीवनसत्व ए आणि सी, लाइकोपीन, पोटॅशियम, मॅगनीज, आर्यन, कॅल्शियम असे पोष्टीक घटक आढळतात. ते रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.