ले ले सेल्फी ले ले

  मुंबई  -  

  शिवाजी पार्क - दादरच्या शिवाजी पार्क इथलं हे सेल्फी पॉईंट. दिवाळीनिमित्त सेल्फी पॉईंट सजलाय कंदीलांनी... वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे कंदील तुम्हाला इथं दिसतील. हा सेल्फी पॉईंट साकारलाय नगरसेवक संदिप देशपांडे, संतोष धुरी आणि कलाकार सुरेशचंद्र तारकर यांच्या संकल्पनेतून.

  तरूणाईला तर निमित्त हवं असतं सेल्फी काढायचं... प्रत्येक क्षणाला कॅपचर करायचं क्रेझ तरूणाईमध्ये असतं... आणि सेल्फी पॉईंट अशा क्रेझीनेससाठीच तर बनलाय...

   रात्रीच्या वेळेत रंगीबेरंगी कंदीलाच्या रोषणाईमुळे शिवाजी पार्कची शोभा आणखीनच वाढलीय. तुम्हीही दादरमधल्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या या सेल्फी पॉईंटला नक्की भेट द्या...

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.