Advertisement

भटक्या कुत्र्यांसाठी 'गॅरेज सेल'


SHARES

ऑपेरा हाऊस - सध्याच्या काळात जिथे माणसातली माणुसकी संपत चाललीय तिथे काही जण मुक्या प्राण्यांसाठीही काम करतात. त्यातलेच एक म्हणजे भटक्या कुत्र्यांचं कल्याण करणारे 'वेलफेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज'चे अध्यक्ष अबोध अरस. दक्षिण मुंबईच्या ऑपेरा हाऊस इथल्या लक्ष्मी बाग हॉलमध्ये गॅरेज सेल चालवला जातो. या ठिकाणी असलेल्या अनेक जुन्या वस्तूंची दुरुस्ती करून त्याची विक्री केली जाते. त्यातून मिळालेल्या पैशातून भटक्या कुत्र्यांचं आणि इतर जनावरांचं संगोपन केलं जातं. या हॉलमध्ये जुनी पुस्तकं, कपडे, भांडी, खेळणी, डीव्हीडी, सजावटीच्या वस्तू, बॅग यांच्यासह विविध वस्तू उपलब्ध आहेत. भटक्या कुत्र्यांसाठी काम करणारे आणि डब्ल्यूएसडीचे प्रमुख अबोध अरस यांनी सांगितलं की, असे अनेक जण आहेत जे या कार्यात मदत करू इच्छितात पण ते पैशाची मदत करू शकत नाही. मग ते अशा वस्तूंची मदत करतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा