मुस्कुराहट सदा के लिये


SHARES

माहिम - आपली बत्तीशी. एकदा गेली की गेलीच. मग कितीही नकली दात आणि कवळी बसवली तरी शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनलच. पण मुंबईकरांनो, आता हा समज जरा बदलायचाय. नव्हे, बदललाय म्हणा ! कारण तुमचे गेलेले दात पुन्हा येणारायेत. आता तुम्ही म्हणाल की एकदा गेलेले दात परत कसे येणार. तो ये जर्मन टेक्नेलॉजी का कमाल है दोस्तों. स्काय इम्प्लिमेंट सिस्टीम या जर्मन कंपनीनं भारतात ही टेक्नोलॉजी आणलीय. स्काय फास्ट अँड फिक्स्ड.

स्काय फास्ट अँड फिक्स्डचं वैशिष्ट्य काय ?

  • फक्त चार इम्प्लांट्समध्ये संपूर्ण दातांची रचना तयार होते
  • अगदी कमी वेळ आणि कमी वेदनेत ही सर्जरी पूर्ण होते
  • इम्प्लांट्सची संख्या कमी झाल्यामुळे येणारा खर्चही जवळपास निम्मा
  • सर्जरी झाल्यानंतर महिन्याभर वाट पहावी लागत नाही. अगदी काही दिवसांमध्ये दात पूर्णपणे कार्यरत होतात
  • दात किडणे किंवा खराब होण्याची शक्यता कमी असते. शिवाय नैसर्गिक दातांप्रमाणेच तुम्ही ब्रश करू शकता

भारतात सध्या फक्त मोठ्या शहरांमध्येच या टेक्नोलॉजीचा वापर केला जातोय. सर्वसामान्यांपर्यंत ही टेक्नोलॉजी पोहोचावी आणि त्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी डॉ. दिलीप देशपांडे यांनी माहिममध्ये त्यांच्या क्लिनिकमध्ये या इम्प्लांट प्रक्रियेचं प्रात्याक्षिक सादर केलं. शिवाय स्काय इम्प्लांटच्या दोन प्रतिनिधींनी प्रत्यक्ष येऊन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना याचं प्रशिक्षणही दिलं.

टीथ इम्प्लांट केल्यानंतर पेशंटला जास्तीतजास्त कम्फर्टेबल वाटावं, कमीत कमी त्रास व्हावा आणि कमी खर्च यावा, यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल असा प्रयत्न स्काय इम्प्लांटचा आहे. शिवाय जे दात बसवले जातात, त्या दातांचा दर्जाही उत्तम ठेवण्यावर 'स्काय'चा भर असतो.

संपूर्णपणे पेशंटला केंद्रस्थानी ठेऊन डिझाईन करण्यात आलेली ही टेक्नोलॉजी आर्थिक आणि वेळखाऊ दृष्ट्याही पेशंटसाठी लाभदायक ठरेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

मराठीसाठी खालच्या लिंकवर क्लिक करा 

https://www.youtube.com/watch?v=PybiHHVQFLY

 

 

 

संबंधित विषय