Advertisement

'पिटा'साठी सनी लिओनी आणि डॅनियलचं न्यूड फोटोशूट


'पिटा'साठी सनी लिओनी आणि डॅनियलचं न्यूड फोटोशूट
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांनी प्राण्यांसाठी काम करणाऱ्या 'पिटा' या संस्थेसाठी एक फोटोशूट केले आहे. 'वर्ल्ड विगन मंथ' या कॅम्पेनमध्ये हे दोघे सहभागी झाले आहेत.सनी आणि डेनियलचे फोटोशूट

'पिटा'च्या या कॅम्पेनसाठी सनी आणि डॅनियलनं एकत्र न्यूड फोटोशूट केलं. त्यांच्या पोस्टरवर 'मिंक नही, इंक! अपनी स्किन में आराम से रहें और जानवरों को उनकी स्किन में रहने दें,' असं लिहण्यात आलं आहे. या कॅम्पेनसाठी सनी-डॅनियलचं हे फोटोसेशन सूबी सॅम्युअल यांनी केलं आहे. हितेंद्र कपोपारा यांनी त्यांचं स्टाइलिंग केलं आहे.'आपण अशा जगात राहतो, जिथे विगन मटेरियल उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लेदरला सिंथेटिक लेदरचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे आता प्राण्यांवर अन्याय करणं थांबवलं पाहिजे. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवण्याची गरज आहे,' असं मत सनीनं व्यक्त केलं आहे.

२൦१६ पासून सनी लिओनी 'पिटा'ची ब्रँड अॅम्बेसिडर आहे.हेही वाचा

क्युट पपीज आणि किटन्स घ्यायचे आहेत? मग या मेळाव्यात सहभागी व्हा

 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement