Advertisement

क्युट पपीज आणि किटन्स घ्यायचे आहेत? मग या मेळाव्यात सहभागी व्हा


क्युट पपीज आणि किटन्स घ्यायचे आहेत? मग या मेळाव्यात सहभागी व्हा
SHARES

तुम्हाला कुत्रे आणि मांजरं आवडतात का? आपल्या कुटुंबात एखादा कुत्रा किंवा मांजर असावं, अशी तुमची इच्छा आहे का? मग लवकरच तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. वांद्रे इथं आयोजित मेळाव्यात तुम्ही कुत्रे आणि मांजर दत्तक घेऊ शकता!


">


बुक अ स्माईल आणि वर्ल्ड फॉर ऑल तर्फे २ आणि ३ डिसेंबरला प्राणी दत्तक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय जातीचे १८० कुत्रे आणि मांजर या दत्तक मेळाव्यात असतील. प्रशिक्षित आणि निरोगी असे हे पपीज आणि किटन्स मेळाव्याचे खास आकर्षण असतील. या पपीज आणि किटन्सचे वेळोवेळी लसीकरण केलेले असते. प्राण्यांना एक कुटुंब आणि घर मिळावं हा या दत्तक उपक्रमाचा उद्देश आहे.


दत्तक मेळाव्याची खासियत काय?

दत्तक मेळाव्यासोबतच प्राणी प्रेमींसाठी अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या स्टॉल्सवर तुम्ही खाण्या-पिण्याचा आनंद लुटू शकता. तसंच, प्राण्यांचे टॅटू, प्राण्यांच्या थिमवर आधारित नेल आर्ट आणि लहान मुलांसाठी अनेक गेम्सचे आयोजन केले आहे. त्यामुळे हा दत्तक मेळावा प्राणी प्रेमींसाठी पर्वणीच आहे.कुठे आहे मेळावा?

वांद्रे इथल्या सेंट तेरेसा हायस्कूलमध्ये दत्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला फक्त ५൦ रुपये मोजावे लागणार आहेत. यासोबतच तुमच्याकडे ओळखपत्र असणं गरजेचं आहे. ज्या प्राणी प्रेमींना घरात पपीज किंवा किटन्स आणायचे आहेत, त्यांनी आवर्जून या मेळाव्याला उपस्थिती लावायला हवी!हेही वाचा

फिरायला जायचंय? पण घरातल्या डॉगीचं करायचं काय? आता नॉट टू वरी!


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा