Advertisement

मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प

SHARE

मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प LIVE Updates: मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे अर्थसंकल्प आज दुपारी सादर करतील

LIVE UPDATES

03:04 PM, Feb 04 IST
पदपथांसाठी १०० कोटींची तरतूद
03:04 PM, Feb 04 IST
कोस्टल रोडसाठी १६०० कोटींची तरतूद
03:03 PM, Feb 04 IST
मुंबईकरांना कोणताही वाढीव कराचा बोजा नाही
02:53 PM, Feb 04 IST
देवनार इथं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीसाठी १०० कोटींची तरतूद
02:52 PM, Feb 04 IST
राणीबाग प्राणी संग्रहालय विस्तारीकरणासाठी ११० कोटी
02:52 PM, Feb 04 IST
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ५ कोटींची तरतूद
02:52 PM, Feb 04 IST
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पेंग्विन दर्शन

शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येणार. ही सहल राजमाता जिजामाता उद्यानात पेंग्विन बघायला जाणार

02:51 PM, Feb 04 IST
दिव्यांग विद्यार्थी-पालक उपस्थिती भत्ता : ३.८ कोटी
02:50 PM, Feb 04 IST
महापालिका शाळांच्या रंगरंगोटीसाठी २०१.७३ कोटींची तरतूद

महापालिका शाळांची वेगळी ओळख विशिष्ठ रंगांद्वारे होणार, महापालिका शाळांना विशिष्ठ ओळख प्राप्त व्हावी यासाठी तपकिरी-पिवळा या रंगाचा संगम असलेली रंगरंगोटी होणार


02:46 PM, Feb 04 IST
शैक्षणिक अर्थसंकल्प

ई-लायब्ररी : १.३० कोटी 

 डिजीटल क्लासरुम - प्राथमिक : ५.३३ कोटी, माध्यमिक : २.९१ कोटी

 टॉय लायब्ररी : ७.३८ कोटी 

 मिनी सायन्स सेंटर्स : ६६ लाख 


02:45 PM, Feb 04 IST
सिसीटीव्ही कॅमेरा : शाळांमधील सुरक्षिततेसाठी सिसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी २४.३० कोटी रुपयांची तरतूद
02:44 PM, Feb 04 IST
खेळांच्या साधनासाठी २ कोटींची तरतूद
Advertisement
02:43 PM, Feb 04 IST
विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्यासाठी १९.६० कोटींची तरतूद

यामध्ये गणवेश, बूट, दप्तर, वह्या, रेनकोटसाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार. तर इतर वस्तूंची रक्कम अनुदान स्वरूपात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार

02:41 PM, Feb 04 IST
पूर्व आणि पश्चिम उपनगरात दोन ठिकाणी विज्ञान कुतूहल भवन उभारण्यासाठी १.२० कोटींची तरतूद
02:41 PM, Feb 04 IST
विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन वाढवून नैराश्य दूर करण्यासाठी समुपदेशन सेवा देण्यासाठी १ कोटींची तरतूद
02:40 PM, Feb 04 IST
नाबेट संस्थेद्वारे पालिका शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता मूल्यमापन करण्यासाठी २० लाखांची तरतूद
02:35 PM, Feb 04 IST
टिंकर लॅबसाठी १.४२ कोटींची तरतूद... यात थ्रीडी डिझाईन, प्रिटींग इलेक्ट्रॉनिक रोबोट बनवणं, मोबाईल अॅप विकसित करणं यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातील
02:34 PM, Feb 04 IST
भाषा कौशल्य समृद्ध करण्यासाठी १.३० कोटी खर्चून भाषा प्रयोगशाळेची उभारणी करणार
Advertisement
02:20 PM, Feb 04 IST
महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटींचा अर्थसंकल्प
02:19 PM, Feb 04 IST
२൦१९-२० वर्षांसाठीचं अर्थसंकल्प सादर
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा