Advertisement

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली : Live Updates

SHARE

LIVE UPDATES

03:12 PM, Jul 16 IST
दुर्घटनाग्रस्त इमारत ११ कुटुंब राहत होते. त्यामधील अनेक भाडोत्री होते.
03:11 PM, Jul 16 IST
केसरबाई २ या इमारतीचा भाग कोसळला आहे.

केसरबाई २ या इमारतीचा भाग कोसळला आहे. ही केसरबाई- १ इमारत आहे.


03:05 PM, Jul 16 IST
म्हाडा आणि पालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत- धनंजय मुंडे

म्हाडा आणि पालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. पूर्नविकासाबाबत सरकार उदासिन आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात न घेता विकासकांच्या फायद्यासाठी सरकार प्रयत्न करते- धनंजय मुंडे

03:02 PM, Jul 16 IST
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर घटनास्थळी दाखल
02:35 PM, Jul 16 IST
दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नाही - विनोद घोसाळकर

डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाची नाही. ही इमारत एका ट्रस्टची इमारत होती अशी माहिती म्हाडा इमारत दुरुस्ती मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी दिली.

02:01 PM, Jul 16 IST
एनडीआरएचं श्वान पथक काढणार ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा माग


01:51 PM, Jul 16 IST
मुंबईत जगायचं कसं? राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांचा प्रश्न
01:48 PM, Jul 16 IST
मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे घटनास्थळी दाखल
01:46 PM, Jul 16 IST
मदतकार्यात सहकार्य करा- काँग्रेस नेते मिलिंद देवरा
01:42 PM, Jul 16 IST
२०१२ मध्ये पुनर्विकासाठी म्हाडाने दिली होती एनओसी
01:42 PM, Jul 16 IST
दुर्घटनाग्रस्त इमारतीतील जखमी, मृतांची नावे पुढीलप्रमाणे:

Habib Hospital.

01 dead - Abdul Sattar Kalu Shaik. 45 yrs 


JJ Hospital

01 dead (woman unidentified)

Injured : 03 including a child.

01:41 PM, Jul 16 IST
रहिवाशांना पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही- भाई जगताप

केसरबाई इमारत जुनी झाल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिली होती

ही इमारत मोडकळीस आलेल्या इमारतींच्या यादी टाकण्याचीही सूचना करण्यात आली होती

जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशी होते तयार

परंतु रहिवाशांना राहण्यासाठी संक्रमण शिबराची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही

त्यामुळे रहिवाशांना इमारतीत राहण्यावाचून पर्याय नव्हता - काँग्रेस आमदार भाई जगताप यांचा आरोप

Advertisement
01:37 PM, Jul 16 IST
दुर्घटनाग्रस्त इमारत १०० वर्षे जुनी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रहिवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

प्राथमिक माहितीनुसार १५ कुटुंब वास्तव्यास असण्याची शक्यता

इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाची नेमणूक करण्यात आली होती

पुनर्विकासासाठी परवानगी देखील देण्यात आली होती

इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी विकासकाने चालढकल केली काय? याची चौकशी करण्यात येईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

01:31 PM, Jul 16 IST
इमामवाडा शाळेत रहिवाशांच्या निवासाची व्यवस्था
01:30 PM, Jul 16 IST
४ मुलांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश

घटनास्थळी १० रुग्णवाहिका दाखल

01:29 PM, Jul 16 IST
एनडीआरएफची टीम सव्वातास उशीराने घटनास्थळी दाखल

इमारत दुर्घटनाग्रस्त झाली ११.४० वाजता तर एनडीआरएफची टीम पोहाेचली १.२५ वाजता

01:21 PM, Jul 16 IST
अग्निशम दलाची गाडी तसंच रुग्णवाहिका आत पोहोचण्यास अडचण
01:19 PM, Jul 16 IST
२ लहान मुलांना वाचवण्यात यश - रहिवासी
Advertisement
01:18 PM, Jul 16 IST
१३ जणांना जे. जे. रुग्णालयात केलं दाखल
01:18 PM, Jul 16 IST
ढिगाऱ्याखालून ३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश


जखमींना जे.जे. रुग्णालयात दाखल केलं

एनडीआरएफची टीम अजूनही घटनास्थळी पोहोचलेली नाही

‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा