Advertisement

समीतने जुळवले ’३६ गुण’


समीतने जुळवले ’३६ गुण’
SHARES

दिग्दर्शकाला चंदेरी दुनियेतील ब्रम्हदेव म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण कथानकाच्या मागणीनुसार, सिनेमासाठी जे आवश्यक असतं ते दिग्दर्शक करत असतात. कोणाची कुंडली कोणाशी जुळवायची हे दिग्दर्शकाला चांगलंच ठाऊक असतं. थोडक्यात काय तर सिनेमा उत्कृष्ट बनवण्यासाठी आवश्यक असणारे ३६ गुण दिग्दर्शकच जुळवत असतो. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासाने पछाडलेला दिग्दर्शक समीत कक्कडने थेट ’३६ गुण’ नावाचा सिनेमाच बनवला आहे.



वेगळ्या विषयावर आधारित सिनेमा


समितने यापूर्वी आशय आणि तंत्राची उत्कृष्ट सांगड घालून ‘आयना का बायना’, ‘हाफ तिकीट’ या मराठी सिनेमांचं यशस्वी दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमांनी बऱ्याच आंतरराष्ट्रीय पातळीवर मान-सन्मान मिळवला आहे. नेटफ्लिक्स नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘मंटो’च्या व्यक्तिरेखांवर आधारित ‘आश्चर्य चकीत’ हा बहुचर्चित सिनेमाही लक्ष वेधून घेत असून, समितने केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. असाच एक वेगळ्या विषयावर आधारित असलेल्या ’३६ गुण’ या नवीन चित्रपटाच्या कामात सध्या समित व्यग्र आहे.


लंडनमध्ये चित्रीकरण


या चित्रपटाचं लंडनमधील चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं असून, उर्वरित चित्रिकरण गोव्यात करण्यात येणार आहे. समितने या चित्रपटात मुख्य भूमिकेतील संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची कुंडली जुळवली आहे. लेखक हृषिकेश कोळीने ‘३६ गुण’चं लेखन केलं आहे. प्रसाद भेंडे यांनी छायांकन केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा