Advertisement

सुबोध भावे प्रस्तुत 'आटपाडी नाईटस्'

नितीन विजय सुपेकर दिग्दर्शित ‘आटपाडी नाईट्स’ या आगामी मराठी चित्रपट सुबोध भावे प्रस्तुत करत आहे.

सुबोध भावे प्रस्तुत 'आटपाडी नाईटस्'
SHARES

'डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळच घातलाच. शिवाय प्रेक्षकांच्या मनावर देखील अधिराज्य गाजवलं. आता सुवोध भावे एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहे. नितीन विजय सुपेकर दिग्दर्शित ‘आटपाडी नाईट्स’ या आगामी मराठी चित्रपट सुबोध भावे प्रस्तुत करत आहे.

सुबोध भावेनं याचा पोस्टर नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाचं शीर्षक बंद असलेल्या घराच्या दारावर दाखवलं गेलं आहे. हा पोस्टर शेअर करताना सुबोधनं लिहलं आहे की, "एका महत्त्वाच्या विषयावरचा गोड चित्रपट! हा चित्रपट प्रस्तुत करण्याचा मनापासून आनंद! मायदेश मीडिया आणि सुबोध भावे सादर करीत आहेत- "आटपाडी नाईटस्"

सुबोध भावे या चित्रपटाचा प्रेझेंटर असून सयाली संजीव, छाया कदम, प्रणव रावराणे, आरती वडागबळकर, संजय कुलकर्णी आणि विठ्ठल काळे हे सर्व कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २७ डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा

हृतिक रोशन ठरला आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरुष

‘जयेशभाई जोरदार’मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लुक पाहिलात का?


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा