हृतिक रोशन ठरला आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरुष

ब्रिटनमधील ‘इस्टर्न आय’ या साप्ताहिकानं याबाबत केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आलं आहे.

SHARE

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरुष ठरला आहे. केवळ २०१९ या वर्षातील नव्हे तर या दशकातील सर्वाधिक सेक्सी पुरुष म्हणून हृतिकनं हा बहुमान पटकावला आहे. ब्रिटनमधील ‘इस्टर्न आय’ या साप्ताहिकानं याबाबत केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आलं आहे

जगभरातील चाहत्यांनी केलेल्या मतदानानंतर टॉप ५० सेक्सी पुरुषांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात हृतिक पहिल्या स्थानावर आहे. तर अभिनेता शाहिद कपूर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच अभिनेता विवियन डिसेनानं तिसरा तर टायगर श्रॉफनं चौथ्या क्रमांक पटकावला आहे. या यादीमध्ये पाकिस्तानी वंशीय ब्रिटीश गायक जायन मलिक पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वांचा लाडका क्रिकेटपटू विराट कोहली सातव्या क्रमांकावर आहे.

सेक्सी पुरुषचा मान मिळवल्यानंतर हृतिकनं आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. यावेळी हृतिक म्हणाला की, 'एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये व्यक्तीचे दिसणे महत्त्वाचे नसते. मी एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरून परिक्षण करत नाही. त्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्यात काय मिळवलं आहे, त्याचा जीवन प्रवास कसा होता? आणि एखाद्या गोष्टीला ती व्यक्ती कशी सामोरी जाते? याचं निरीक्षण करून मी तो व्यक्ती कसा हे ठरवत असतो.'हेही वाचा

आनंद कुमार यांच्यानंतर आणखी एका गणित तज्ञावर बनणार बायोपिक

नसबंदीवर आधारीत 'शुक्राणू'

संबंधित विषय
ताज्या बातम्या