Advertisement

आनंद कुमार यांच्यानंतर आणखी एका गणित तज्ञावर बनणार बायोपिक

आता आणखी एका महान गणितज्ञाच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आनंद कुमार यांच्यानंतर आणखी एका गणित तज्ञावर बनणार बायोपिक
SHARES

आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारीत सुपर ३० प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. आता आणखी एका महान गणितज्ञाच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नीरज पाठक महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांच्यावरील बायोबिकचं दिग्दर्शन करणार आहेत.

नीरज पाठक यांनी सांगितलं की, भारतीय महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांच्याबद्दल मी ऐकलं होतंपण मला त्यांच्याबद्दल अधिक माहिती हवी होती. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुक्ता होतीपण मी जेव्हा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो ते भानात नव्हतेत्यांना कळत नव्हतं ते काय बोलत आहेत. पण मी निश्चय केला कीजगासमोर यांची कहानी आणणारच. मला यात साथ मिळाली ती एक्सएल एंटरटेंमेंटचे रितेश सिद्वनीफरहान अख्तर यांचीआता मी एकत्र येत त्यांची स्टोरी जगासमोर चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर घेऊन येत आहोत.

यासंदर्भातच नुकतीच पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत नीरज पाठक यांच्यासोबत नारायण सिंह यांच्या कुटुंबातील सदस्य हरिश्चंद्र  सिंह, मुकेश सिंह, शिव मंगल जी, राकेश सिंह आणि मिथिलेश सिंह उपस्थित होते

महान गणितज्ञ वशिष्ठ नारायण सिंह यांनी आइंस्टाईनची यांच्या 'थेरी ऑफ रिलेटिविटी'ला चॅलेंज दिलं होतं.  नारायण सिंह यांना पुस्तकं वाचायला आवडायची आणि आपला अधिक वेळ पुस्तकं वाचवण्यासाठी द्यायचे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं


हेही वाचा

नसबंदीवर आधारीत 'शुक्राणू'

‘जयेशभाई जोरदार’मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लुक पाहिलात का?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा