Advertisement

अभय आणि दिप्ती बनले ‘लकी’ कलाकार!


अभय आणि दिप्ती बनले ‘लकी’ कलाकार!
SHARES

दिग्दर्शक संजय जाधवने ‘लकी’ या आपल्या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केल्यावर त्यामध्ये कोणकोणते कलाकार असतील याविषयी मागील कित्येक दिवस सिनेसृष्टीत उत्सुकता होती.

सई ताम्हणकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, स्पृहा जोशी, श्रेया बुगडे, सोनाली खरे या कलाकारांनी तेच ‘लकी’ असल्याचं जाहीरही केलं, पण त्यांच्या जोडीला आणखी दोन ‘लकी’ कलाकार या सिनेमात दिसणार आहेत.


लकी कलाकारांची घोषणा

खुद्द संजयनेच त्याच्या सिनेमातल्या लकी कलाकारांची घोषणा केली आहे. अभिनेता अभय महाजन आणि अभिनेत्री दिप्ती सती आपल्या सिनेमाचे हिरो-हिरोइन असल्याची घोषणा संजयने सोशल मीडियाद्वारे केली आहे.

वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या या दोन खास कलाकारांना लाँच करण्यासाठी संजयने एक गाणंच चित्रीत केलं आहे. ‘अहो, दादा आता सांगा नंबर कुणाचा आला...’ हे गीत सचिन पाठक यांनी लिहिलं आहे, तर अमितराज, सायली पंकज आणि रोहित राऊत यांनी हे धमाल गाणं गायलं आहे.


काय म्हणाले निर्माते? 

याविषयी निर्माते सुरज सिंग म्हणतात, “हेच तर दादांचं म्हणजेच संजय जाधव यांचं वैशिष्ट्य आहे. दादा नेहमी काहीतरी वेगळं करतात. त्यांनी त्यांच्या मागच्या सिनेमाचा टिझर ६० कॅमेऱ्यांनी चित्रीत केला होता. तर आता आमच्या सिनेमाचे हिरो-हिरोइन लाँच करण्यासाठी हे धमाल गाणं दादांनी त्यांच्या स्टाइलनं चित्रीत केलं आहे''.

दिपक राणे यांची निर्मिती असलेला ‘लकी’ ७ डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.


हेही वाचा - 

'इकडून तिकडे...’ म्हणत अजयने वेस्टर्न स्टाईलमध्ये गायलं गाणं

'बॉईज २’चं मस्तीदार गाणं लाँच

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा