संदीपचा नवा अवतार

‘कृतांत’ या सिनेमात अभिनेता संदीप कुलकर्णी पुन्हा एकदा एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रेनरोज फिल्म्स’च्या बॅनरखाली मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे.

SHARE

मराठीसह हिंदीतही अभिनयाचं चलनी नाणं म्हणून ओळखला जाणारा अभिनेता संदीप कुलकर्णी नेहमीच नावीन्यपूर्ण भूमिकांच्या शोधात असतो. आता ‘कृतांत’ या मराठी सिनेमासाठी त्याने पुन्हा एक नवा अवतार धारण केला आहे.


सिनेमाचा फर्स्ट लूक रिव्हील

सिनेमातील भूमिका कोणतीही असो, त्यासाठी आवश्यक ती मेहनत घ्यायला संदीप नेहमीच तत्पर असतो. त्यामुळेच संदीपची भूमिका असलेल्या सिनेमांकडून प्रेक्षकांच्याही अपेक्षा वाढतात. आता ‘कृतांत’ या सिनेमात संदीप पुन्हा एकदा एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांना भेटणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे.


आजची लाइफस्टाईल...

दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. ‘कृतांत’चं कथानक आजच्या लाइफस्टाइलवर आधारित आहे. भंडारे यांनी या चित्रपटात वर्तमान काळातील दैनंदिन जीवनाची सांगड जगण्याच्या तत्त्वज्ञानाशी घालत एक अनोखी कथा सादर केली आहे.


तात्विकतेचा संबंध...

या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या धावपळीच्या व्यावहारीक जीवनातील तात्विकतेचा संबंध अधोरेखित करण्यात आला आहे. संदिपच्या जोडीला या सिनेमात सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन यांच्या भूमिका आहेत. संगीतकार विजय नारायण गावंडे यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिलं असून विजय मिश्रा यांनी छायालेखन केलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या