Advertisement

आदिती पोहनकरची ‘ट्रकभर स्वप्नं’


आदिती पोहनकरची ‘ट्रकभर स्वप्नं’
SHARES

‘लय भारी’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेली ग्लॅमरस अभिनेत्री आदिती पोहनकर नंतर चित्रपटसृष्टीत फारशी दिसली नाही. आता ती ‘ट्रकभर स्वप्नं’ या सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.


अादितीचं पुनरागमन

‘लय भारी’ या मराठी चित्रपटानंतर दक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर तब्बल चार वर्षांनी अादिती ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर पुनरागमन करत आहे. २४ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या मराठी चित्रपटात ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि आणि आदित्य चित्र प्रा.लि प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांनी केलं आहे.


काय म्हणाली आदिती?

चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना आदिती म्हणाली की, आजवरच्या माझ्या ग्लॅमरस भूमिकांपेक्षा वास्तवतेच्या जवळ जाणारी भूमिका मला ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटात साकारायला मिळाली आहे. सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब यात प्रत्येकाला पहायला मिळेल. यात मी मकरंद देशपांडे आणि क्रांती रेडकर यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे.


चित्रपटात 'या' कलाकारांच्या भूमिका

या चित्रपटात आदितीसोबत मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मुकेश ऋषी, मनोज जोशी, स्मिता तांबे, विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगरे, साहिल गिलबिले, ज्योती जोशी, सतीश सलागरे, सुरेश भागवत, जयंत गाडेकर, दिपज्योती नाईक या कलाकारांच्या भूमिका आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा