Advertisement

आपल्या माणसाचा दमदार टीझर लॉन्च


आपल्या माणसाचा दमदार टीझर लॉन्च
SHARES

नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'आपला माणूस' या चित्रपटाचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सतिश राजवाडे यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती अजय देवगणने केली आहे.


सिनेमातील इतर कलाकार

अजय देवगणने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर हा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये नाना पाटेकर क्राईम ब्रँचमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. यामध्ये नाना एका मृत्यूची चौकशी करताना दिसत असून मारूती नागरगोजे असं या भूमिकेचं नाव आहे. या चित्रपटात नानांसोबत सुमित राघवन आणि इरावती हर्षे दिसतील.


अजय देवगण पाहुणा कलाकार

काही दिवसांपूर्वी अजयने या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. आता त्याने आपल्या ट्विटरवरून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. पहिल्या पोस्टरमध्ये नाना पाटेकर भर पावसात बाईक चालवताना दिसत असून पोस्टरवर ‘सैतान बाटलीत मावणार नाय’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. या सिनेमात अजय देवगण हा पाहुणा कलाकार असणार आहे. हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा