Advertisement

अभिनेत्री अश्विनी एकबोटे कालवश


अभिनेत्री अश्विनी एकबोटे कालवश
SHARES

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं शनिवारी पुण्यात निधन झाले. त्या 44 वर्षांच्या होत्या. पुण्यातील भरत नाट्यमंदिरात ‘नाट्यत्रिविधा’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता. डान्स करत असतानाच त्यांनी शेवटची गिरकी घेतली आणि त्या रंगमंचावर कोसळल्या. हा नाटकातीलच भाग आहे असं तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला वाटलं . त्यानंतर पडदा ही पडला मात्र त्या जमिनीवर कोसळल्या त्या कायमच्याच.

अश्विनी एकबोटे या दुर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात यासारख्या मालिकांमधून घराघरामध्ये पोहोचल्या होत्या. असंभव मालिकेतील त्यांची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. सध्या अश्विनी एकबोटे या कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत रावणाच्या आईच्या भूमिकेत दिसत होत्या. अश्विनी एकबोटे यांनी 'बावरे प्रेम हे', 'तप्तपदी', 'आरंभ', 'क्षण हा मोहाचा', 'हायकमांड' या मराठी चित्रपटात देखील काम केले होते. अभिनेते शरद पोंक्षे यांनी दु:ख व्यक्त करताना सांगितले की, 'खूप लवकर अश्विनीने एक्झिट घेतली', 'आता कुठे खऱ्याअर्थी तिच्या करिअरची सुरुवात झाली होती', 'आणि अशा प्रकारे ती सोडून गेली'
'हल्ली नृत्याचे शो फार कमी होतात म्हणून जेव्हा जेव्हा मला नाचायला मिळेल तेव्हा मी नाचणार हे तिचं शेवटचं परफॉर्मन्स करण्याआधीचं वाक्य' असल्याचं' अभिनेते शरद पोंक्षे यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा