Advertisement

महेश कोठारेंच्या घरात आली चिमुकली पावलं!


महेश कोठारेंच्या घरात आली चिमुकली पावलं!
SHARES

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या घरी एका परीचं आगमन झालं आहे. आदीनाथने सोशल मिडीयावरून ही खूशखबर आपल्या चाहत्यांना दिली आहे. उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे!

कोठारेंच्या घरात गोंडस परीचं आगमन झाल्यामुळे संपूर्ण परिवार प्रचंड खूष आहे. आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल आहे. त्यांची जोडी सगळ्यांनाच खूप आवडते.

आदीनाथने 'इट्स अ बेबी गर्ल' अशी पोस्ट सोशल मिडीयावर टाकली आहे. आणि त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरून अभिनंदन केलं आहे.




आदिनाथ उर्मिलाची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

शुभमंगल सावधान हा उर्मिलाचा पहिला चित्रपट. या चित्रपटात उर्मिलाची मुख्य भुमिका होती. महेश कोठारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तर आदिनाथ या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक होता. उर्मिलाला सेटवर पाहताच क्षणी आदीनाथ तिच्या प्रेमात पडला होता. याच सेटवर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यानंतर ते अनेकदा एकमेकांना भेटले. त्यानंतर आदिनाथने पुण्यात एका कॉफी शॉपमध्ये उर्मिलाला प्रपोज केलं. आणि अखेर अनेक वर्ष एकमोकांना डेट केल्यानंतर २०११मध्ये या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि आज १८ जानेवारीला उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सध्या कोठारे कुटुंबात नव्या पाहुण्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे.



गरोदरपणात सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

गरोदरपणात सोशल मीडियामार्फत उर्मिला सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होती. योगा करतानाचे अनेक व्हिडिओ तिने शेअर केले होते.



हेही वाचा

शिल्पा शिंदेला करायचंय मराठी बिग बॉसचं सूत्रसंचालन


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा