Advertisement

उर्मिलाने शेअर केले तिच्या बेबीमूनचे फोटो!

उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी पेंच अभयारण्यात आपला बेबीमून सेलेब्रेट केला. यावेळी त्यांनी काही फोटो आपल्या सोशल साईटवर शेअर केले आहेत

उर्मिलाने शेअर केले तिच्या बेबीमूनचे फोटो!
SHARES

बेबीमूनला जाण्याचा ट्रेंड सध्या मराठी सेलिब्रिटी फॉलो करताना दिसत आहेत. हनीमूननंतर बेबीमूनला जाण्याची क्रेझ बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये आतापर्यंत दिसून आली आहे. नुकतेच अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी पेंच अभयारण्यात आपला बेबीमून सेलिब्रेट केला. यावेळी त्यांनी काही फोटो आपल्या सोशल साईटवर शेअर केले आहेत. त्यांच्या या बेबीमूनमुळे हा ट्रेंड मराठी चित्रपटसृष्टीतही रूढ होतोय असंच दिसतंय. या आधीही उर्मिलाने आपला बेबीशॉवर दणक्यात सेलिब्रेट केले होते. पारंपारिक आणि ट्रेंडी अशा दोन्ही अंदाजात उर्मिलाने बेबीशॉवर एन्जॉय केला. उर्मिलाच्या बेबीशॉवरला मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली. पारंपारिक डोहाळजेवणात उर्मिला निळ्या साडीत, तर आदीनाथ निळ्या सदऱ्यामध्ये दिसला. तर उर्मिलाची मैत्रिण फुलवा खामकरने उर्मिलासाठी आयोजित केलेल्या बेबीशॉवरमध्ये उर्मिला पिवळ्या रंगाच्या गाऊनमध्ये भाव खाऊन गेली. या बेबीशॉवरसाठी गुलाबी आणि निळ्या रंगाची थीम ठेवण्यात आली होती.हेही वाचा

सुपरस्टार रजनीकांत यांची मराठी चित्रपटात एन्ट्री


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा