SHARE

दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहेत. बिग बजेट चित्रपटात काम करणारा अभिनेता अशी रजनिकात यांची ओळख. पण पहिल्यांदाच त्यांच्या अभिनयाची जादू मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या निमित्तानं त्यांच्या मराठी चाहत्यांची इच्छा मात्र पूर्ण झाली.

'पसायदान' या मराठी चित्रपटात रजनीकांत काम करणार आहेत. रजनीकांत यांच्यासोबत या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेते मामुट्टी देखील झळकणार आहेत. बाळकृष्ण सुर्वे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक भावे करत आहेत. जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होऊ शकते.

रजनीकांत हे मूळचे महाराष्ट्रीयन आहेत. शिवाजीराव गायकवाड हे रजनीकांत यांचे खरे नाव आहे. रजनीकांत यांनी यापूर्वी कधीच मराठी सिनेमात काम केले नाही. पहिल्यांदाच ते एका मराठी चित्रपटात काम करणार आहेत.हेही वाचा

महाराष्ट्राची 'मोस्ट स्टायलिश दिवा' सई ताम्हणकर!


संबंधित विषय
ताज्या बातम्या