Advertisement

महाराष्ट्राची 'मोस्ट स्टायलिश दिवा' सई ताम्हणकर!


महाराष्ट्राची 'मोस्ट स्टायलिश दिवा' सई ताम्हणकर!
SHARES

मराठी फिल्म इंडस्ट्रीला ग्लॅमर आणणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच स्टाईल आयकॉन राहिली आहे. तरुणाईने तिचे अनेक ट्रेंड्स फॉलो केले आहेत आणि तिचे अनेक फॅशन स्टेटमेंट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरलेत. तिच्या याच फॅशन सेन्सला गौरविण्यासाठी या वर्षीचा 'लोकमत अवॉर्ड्स' एक खास निमित्त ठरलाय. मराठीतली 'मोस्ट स्टायलिश दिवा' हा अवॉर्ड देऊन तिला गौरवण्यात आलं आहे.

हा अवॉर्ड स्वीकारताना देखील सई ताम्हणकर अवॉर्डला साजेसा असाच पेहेराव करून आली होती. प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे यांनी डिझाईन केलेला काळ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे दागिने न घालता, सई ताम्हणकर लोकमत अवॉर्डच्या रंगमंचवार 'मोस्ट स्टायलिश दिवा' हा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी अवतरली!



या अवॉर्डबाबत सई म्हणते, "स्वतःचे पब्लिक अपिअरन्सेस स्टायलिश आणि फॅशनेबल ठेवण्याचे आपण जे प्रयत्न केले आहेत, त्या प्रयत्नांना सन्मानित करण्यासाठी कोणी तुम्हाला 'मोस्ट स्टायलीश दिवा' असा अवॉर्ड देतं, तेव्हा खूप छान वाटतं. लोकमत आणि दर्डा कुटुंबीयांची मी खूप आभारी आहे. आयुष्यात विविध वाटचाली करणाऱ्या लोकांना असं एकाच मंचावर भेटणं आणि त्यांच्यासोबत गौरविलं जाणं फार छान वाटतं. हा अवॉर्ड नक्कीच मला आणखी स्टयलिश आणि फॅशनेबल राहण्यास प्रेरणा देईल यात शंका नाही."



हेही वाचा

सईचा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा