Advertisement

मराठी पडद्यावर झळकणार ‘बच्चन’

विषयासोबत सादरीकरणावरही हुकूमत गाजविणारा समीत कक्कड हा दिग्दर्शक आता ‘बच्चन’ हा चित्रपट घेऊन येणार आहे.

मराठी पडद्यावर झळकणार ‘बच्चन’
SHARES

मराठी सिनेजगतात नेहमीच नवनवीन विषय आणि आशयाचे चित्रपट येत असतात. असाच एक जबरदस्त विषय लवकरच मराठी रूपेरी पडद्यावर आकारास येणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरलेल्या ‘हाफ तिकीट’ या सिनेमाचा दिग्दर्शक समीत कक्कड सध्या ‘बच्चन’ असं शीर्षक असलेल्या सिनेमाच्या कामात व्यग्र आहे.


विषयासोबत सादरीकरणावरही हुकूमत 

एव्हीके एंटरटेन्मेंट आणि पर्पल बुल एंटरटेन्मेंट या बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचं शीर्षक ऐकल्यावर याचा नेमका विषय काय असेल? यात मुख्य भूमिकेत कोण दिसेल? यांसारखे प्रश्न पडणं साहजिक आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं सिनेरसिकांना लवकरच मिळणार आहेत. समीतने ‘आयना का बायना’ आणि ‘हाफ तिकीट’ हे मनोरंजक आणि आशयघन चित्रपट दिले आहेत. त्यांच्या 'हाफ तिकीट' चित्रपटाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बहुमान मिळवले असून २८ नामांकित फिल्म फेस्टिवल्समध्ये ३१ मानाच्या पुरस्कारांनी समित यांना गौरविण्यात आलं आहे. विषयासोबत सादरीकरणावरही हुकूमत गाजविणारा हा दिग्दर्शक आता ‘बच्चन’ हा चित्रपट घेऊन येणार आहे.


ज्वलंत विषय

ओम प्रकाश भट, स्वाती खोपकर, सुजय शंकरवार निर्मित ‘बच्चन’ चित्रपटाचं लेखन समित कक्कड आणि ऋषिकेश कोळी यांनी केलं आहे. या दोघांच्या लेखणीतून साकारलेल्या ज्वलंत विषयाची कथा–पटकथा समित-ऋषिकेश यांचीच आहे, तर संवाद ऋषिकेश कोळी यांनी लिहिले आहेत.


२०१९ मध्ये प्रदर्शित

'लय भारी' या चित्रपटानंतर एव्हीके एंटरटेन्मेंटने 'येरे येरे पैसा' सारखा धम्माल चित्रपट दिला. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या दर्जेदार नाटकांची निर्मिती करत अमेय खोपकर यांची एव्हीके एंटरटेन्मेंट संस्था, मनोरंजन क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करत आहे. त्यामुळे ‘बच्चन’ सिनेमाबाबतही सिनेसृष्टीत चर्चा रंगू लागली आहे. ‘बच्चन’ या शीर्षकावरून चित्रपटाविषयीची तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. या ‘बच्चन’ मध्ये नेमकं काय असणार हे गुलदस्त्यात असलं तरी काहीतरी नक्कीच जबरदस्त घेऊन, ‘बच्चन’ आपल्यासमोर २०१९ मध्ये अवतरणार आहे.



हेही वाचा -

मैत्रीचं नातं सेलिब्रेट करणारं रोहित-जुईलीचं गाणं

'राकेश ओमप्रकाश मेहरांचीच तशी इच्छा होती!'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा