Advertisement

'या' मराठी चित्रपटात दिसणार दलिप ताहिल

'भाई - व्यक्ती की वल्ली'च्या ट्रेलर लाँच प्रसंगी उपस्थित असलेल्या ताहिल यांनी या चित्रपटात आपण एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असल्याचं सांगितलं. व्हायकॅाम १८ मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सागर देशमुखने पुलंची तर इरावती हर्षेने सुनीताबाईंची भूमिका साकारली आहे.

'या' मराठी चित्रपटात दिसणार दलिप ताहिल
SHARES

मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या यशामुळे आज सर्वांच्याच मनात मराठी चित्रपटसृष्टीबद्दल आकर्षण आहे. त्यामुळेच एका मागोमाग एक हिंदीतील दिग्गजांची पावलं मराठी चित्रपटांकडे वळत आहेत. आता या कलाकारांच्या यादीत अभिनेता दलिप ताहिल यांचं नावही सामील झालं आहे.


मराठी चित्रपटसृष्टीत दाखल

दलिप ताहिल यांचं नाव घेताच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका क्षणार्धात डोळ्यांसमोर येतात. १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अंकुर' चित्रपटापासून आजपर्यंत ताहिल यांनी खलनायकी व्यक्तिरेखांसोबत काही सकारात्मक भूमिकाही अगदी सहजपणे साकारल्या आहेत. आता 'भाई - व्यक्ती की वल्ली' या चित्रपटाद्वारे ते मराठी चित्रपटसृष्टीत दाखल होत आहेत. हा चित्रपट महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेले थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा जीवनपट उलगडणारा आहे.


'या' सीनमध्ये काम

'भाई - व्यक्ती की वल्ली'च्या ट्रेलर लाँच प्रसंगी उपस्थित असलेल्या ताहिल यांनी या चित्रपटात आपण एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, ''मराठी साहित्यातील खूप मोठं नाव असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावरील चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल माझे मित्र आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे आभार. त्यांनी एकदा अचानक मला फोन केला आणि या चित्रपटाबाबत सांगितलं, तेव्हा मला खूप आनंद झाला. आजवरच्या ४४ वर्षांच्या कारकिर्दीत मी कोणत्याही मराठी चित्रपटात काम केलेलं नाही. या चित्रपटात मी दिवंगत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची भूमिका साकारली आहे. पुलं आणि नेहरूंची भेट आकाशवाणी केंद्रावर झाली होती तो सीन या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.''


७० कलाकार

व्हायकॅाम १८ मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सागर देशमुखने पुलंची तर इरावती हर्षेने सुनीताबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात एकूण ७० कलाकार दिसणार आहेत. ज्येष्ठ साहित्यीक रत्नाकर मतकरी आणि गणेश मतकरी यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे.हेही वाचा-

दोन भागांमध्ये भेटणार मराठी साहित्यातील 'भाई'

गुरू-राधिकाच्या उपस्थितीत रंगला ‘तेरा दिवस प्रेमाचे’ नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोगसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा