Advertisement

गुरू-राधिकाच्या उपस्थितीत रंगला ‘तेरा दिवस प्रेमाचे’ नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग

‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नवीन नाटकानेही अल्पावधीत २५ प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. या रौप्य महोत्सवी प्रयोगाला उपस्थित राहून गुरू आणि राधिका यांनी ‘तेरा दिवस प्रेमाचे’च्या टीमचं कौतुक केलं.

गुरू-राधिकाच्या उपस्थितीत रंगला ‘तेरा दिवस प्रेमाचे’ नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग
SHARES

रौप्य महोत्सवी म्हणजेच २५ प्रयोगांचा टप्पा गाठला जाणं हे कोणत्याही नाटकाच्या टीमसाठी मनोबल उंचावणारं ठरतं. त्यामुळेच अल्पावधीत एखाद्या नाटकाने रौप्यमहोत्सवी प्रयोगापर्यंत मजल मारणं खूप महत्त्वाचं ठरतं. शिरीष राणेच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नवीन नाटकानेही अल्पावधीत २५ प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. या रौप्य महोत्सवी प्रयोगाला उपस्थित राहून गुरू आणि राधिका यांनी ‘तेरा दिवस प्रेमाचे’च्या टीमचं कौतुक केलं.


ब्लॅक काॅमेडी

आजघडीला गुरू आणि राधिका म्हटलं की, सर्वांच्या डोळ्यांसमोर उभी राहते झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील गुरू म्हणजे अभिजीत खांडकेकर आणि राधिका म्हणजे अनिता दाते ही जोडी. ब्लॅक काॅमेडी प्रकारात मोडणारं ‘तेरा दिवस प्रेमाचे’ हे नाटक या जोडीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहात एन्जाय केलं. यातील ब्लॅक काॅमेडीला उत्तम दादही दिली. हे जमून आलं ते या नाटकात मुख्य भूमिकेत असलेल्या अरुण नलावडे यांच्यामुळे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत नानांची भूमिका साकारणाऱ्या नलावडेंच्या आग्रहाखातर या मालिकेची टीम रौप्यमहोत्सवी प्रयोगाला हजर राहिली.


मान्यवर उपस्थित

अभिजीत-अनिताच्या जोडीला यावेळी ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील रोहिणी निनावे, मिहीर राजदा, कुणाल साळुंखे हे कलाकार तसंच अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर, व्हिडीओ पॅलेसचे नानुभाई जयसिंघानी हे मान्यवरही उपस्थित होते. या नाटकात अरुण नलावडे यांच्यासोबत माधवी दाभोळकर, शर्वरी गायकवाड, देवेश काळे, नीता देवकर, संजय देशपांडे, सुचित ठाकूर यांनी अभिनय केला आहे. शिरीष राणे दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती अनुराधा सामंत यांनी अनुराधा फॅक्टरी आणि जिव्हाळा या नाट्यसंस्थांअंतर्गत केली आहे. आनंद म्हसवेकरांनी या नाटकाचं लेखन केलं आहे.हेही वाचा - 

मराठी रंगभूमीवर खुलणार 'खळी'

मराठी कार्यक्रमात अवतरल्या विदेशी अप्सरा!
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा