Advertisement

मराठी रंगभूमीवर खुलणार 'खळी'

'नाट्यमंदार' आणि 'विप्रा क्रिएशन्स' या दोन संस्था 'खळी' हे नवं नाटक घेऊन येत आहेत. या नाटकाचं लेखन व दिग्दर्शन शिरीष लाटकर यांनी केलं आहे.

मराठी रंगभूमीवर खुलणार 'खळी'
SHARES

वर्षाअखेरीस बरीच नवनवीन नाटकं रसिकांच्या सेवेत हजर होत असतात. त्यापैकी काही नाटकं रसिकांच्या पसंतीस उतरतात, तर काही गर्दीचा भाग बनतात. पण आता एक नवं नाटक रंगभूमीवर येणार आहे, जे रसिकांच्या गालावर ‘खळी’ खुलवणारं ठरेल. या नाटकाचं शीर्षकच ‘खळी’ आहे.


खळीद्वारे रंगभूमीवर  दिग्दर्शन

 'नाट्यमंदार' आणि 'विप्रा क्रिएशन्स' या दोन संस्था 'खळी' हे नवं नाटक घेऊन येत आहेत. या नाटकाचं लेखन व दिग्दर्शन शिरीष लाटकर यांनी केलं आहे. आ 'नाट्यमंदार' आणि 'विप्रा क्रिएशन्स' या दोन संस्था 'खळी' हे नवं नाटक घेऊन येत आहेत. या नाटकाचं लेखन व दिग्दर्शन शिरीष लाटकर यांनी केलं आहे. आजवर बरेच चित्रपट, नाटकं आणि मालिकांचं लेखन करणारे लाटकर ‘खळी’द्वारे रंगभूमीवर प्रथमच दिग्दर्शन करणार आहेत. संदेश जाधव, पल्लवी सुभाष व नेहा अष्टपुत्रे हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. या नाटकाच्या निमित्ताने पल्लवी बऱ्याच वर्षांनी रंगभूमीकडे वळली आहे. 


१५ डिसेंबरला शुभारंभ 

१५ डिसेंबर रोजी या नाटकाचा शुभारंभ मुंबईतील दीनानाथ नाट्यगृहात होणार आहे.  'खळी'साठी एक खास गाणंही तयार करण्यात आलं आहे. बीना सातोस्कर यांनी हे गाणं लिहिलं असून, केतन पटवर्धन यांनी संगीतबद्ध केलं आहे. स्वरांगी मराठे यांच्यासह केतन पटवर्धन यांनी हे गाणं गायलं आहे. 


महेश नाईक यांचं पार्श्वसंगीत

'नाट्यमंदार'चे मंदार शिंदे आणि 'विप्रा क्रिएशन्स'च्या संध्या रोठे व प्रांजली मते हे या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचं असून, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना केली आहे. महेश नाईक यांचं पार्श्वसंगीत या नाटकाला आहे. मिताली शिंदे यांनी वेशभूषेची, तर दत्ता भाटकर यांनी रंगभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.



हेही वाचा - 

प्रीमियर वर्षा-किशोरीच्या 'पियानो फॉर सेल'चा

हे आहे प्रिया-उमेशच्या 'गोड बातमी'तील सिक्रेट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा