Advertisement

टायगर श्रॉफचं मित्रासाठी कायपन!


टायगर श्रॉफचं मित्रासाठी कायपन!
SHARES

केवळ बॉलिवूडच नाही, तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनबाबतीत कमालीचा सजग असतो. पण बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ ३० मार्च रोजी येणाऱ्या स्वत:च्या 'बागी-२' या सिनेमाऐवजी त्याच तारखेला प्रदर्शित होणाऱ्या एका मराठी सिनेमाचं प्रमोशन करतोय. तेही केवळ मैत्री खातर!


'गावठी' आणि 'बागी-२'मध्ये स्पर्धा

येत्या ३० मार्चला टायगर श्रॉफचा बहुचर्चित 'बागी-२' आणि मराठीत 'गावठी' हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. खरंतर दोन्ही भिन्न भाषेतले आणि प्रकाराचे चित्रपट असले तरी एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ह्या चित्रपटांमध्ये महाराष्ट्रात तरी सिनेमागृह आणि प्रेक्षक मिळविण्यासाठी स्पर्धा नक्कीच आहे. 'गावठी' या सिनेमाचा दिग्दर्शक आनंद कुमार उर्फ ॲण्डी हा प्रसिद्ध सिने तसेच नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजा यांचा सहायक आहे.


अॅण्डी आणि टायगरची दोस्ती!

गुरूस्थानी असलेल्या रेमो डिसोजा सरांच्या हस्ते पहिले गाणे प्रकाशित झाल्यानंतर टायगरच्या हस्ते आपल्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि दुसरे ‘भन्नाट’ हे गाणे प्रकाशित व्हावे, अशी ॲण्डीची मनोमन इच्छा होती. ॲण्डीने त्याच्या मनातील खरी इच्छा टायगरला सहज बोलून दाखवली. तेव्हा टायगरने ट्रेलर आणि दुसरे गाणे लाँच करण्यासाठी लगेच होकार दिला. इतकेच नाही तर तारीख आणि वेळही सांगितली. आणि 6 मार्च रोजी मुंबईत एका सोहळ्यात टायगर श्रॉफ आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक बॉस्को यांच्या हस्ते 'गावठी' या चित्रपटाच्या ट्रेलर आणि दुसऱ्या गाण्याचे संगीत लाँच झाले. इतकेच नव्हे, तर टायगरने आणि बॉस्को ‘भन्नाट’ या धडाकेबाज आयटम साँगवर ॲण्डीसोबत मनसोक्त थिरकलेही!


'फ्लाईंग जट' या माझ्या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान ॲण्डी सरांकडून मला जे काही मिळालं, त्याने माझी कला अधिक बहरली, असं मी मानतो. अतिशय कल्पक आणि मेहनती माणूस आहे. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शित केलेला 'गावठी' हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा असेल.


टायगर श्रॉफ, अभिनेता



हेही वाचा

शंकर महादेवनचा नवीन मराठी प्रोजेक्ट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा