Advertisement

शंकर महादेवनचा नवीन मराठी प्रोजेक्ट!


शंकर महादेवनचा नवीन मराठी प्रोजेक्ट!
SHARES

अनेक वेळा मुलांच्या छोट्या विश्वात रमताना मोठेही त्यांच्याबरोबर लहान होतात. मात्र, छोट्यांच्या विश्वात डोकावून पहिले, तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चाललेली असते, हे नक्की कळू शकेल. या छोट्यांच्या दुनियेत घेऊन जात त्यांच्या मनातील भावना प्रेक्षकांना उलगडून बघता येणार आहेत गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्यामुळे.

मुलांशी संवाद साधत त्यांच्या बालविश्वात घेऊन जाणारं सुमधुर गीत नुकतंच शंकर महादेवन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलं. योगायतन फिल्म्स् च्या आगामी ‘परी हूँ मैं ’या चित्रपटातील हे गीत अभिषेक खणकर यांच्या लेखणीतून साकारले आहे.



'करूया किलबिल चिऊ काऊ सवे जरा' असे बोल असलेल्या या गीतातून बालपणाची मौज, त्यातील निरागसता टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बालविश्वाची सुरेख सफर घडवणारं हे गीत प्रत्येकाला आपल्या बालपणाची आठवण करून देईल, असा विश्वास गायक शंकर महादेवन यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

जगण्याचा संघर्ष आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा मेळ साधत एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा ‘पॅशनेबल’ प्रवास ‘परी हूँ मैं’ चित्रपटात दाखवण्यात आला आहे. नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला राजेंद्र सिंह असून दिग्दर्शन रोहित शिलवंत यांचे आहे.



हेही वाचा

आता के. के. मेनन मराठीत पदार्पण करणार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा