Advertisement

उत्तुंग ठाकूरचा 'डोक्याला शॉट' !


उत्तुंग ठाकूरचा 'डोक्याला शॉट' !
SHARES

'बालक पालक' आणि 'यल्लो' सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर 'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन' आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांची निर्मिती असलेला 'डोक्याला शॉट' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


'या' कलाकारांच्या भूमिका

आजवर बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शन करणारे शिवकुमार पार्थसारथी 'डोक्याला शॅाट' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळले आहेत. सोशल मीडियावर नुकत्याच झळकलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या कलरफूल लूकमध्ये सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, रोहित हळदीकर, गणेश पंडित आणि ओमकार गोवर्धन हे अतरंगी कलाकार दिसत आहेत. चित्रपटातील इतर व्यक्तीरेखाही लवकरच प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं प्रोडक्शन हाऊसच्या वतीने सांगण्यात येत आहे.


चित्रपटाचा पहिला लुक समोर

चित्रपटाच्या शीर्षकावरूनच या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे कळतंय. त्यामुळे आता हे 'कल्ला'कार प्रेक्षकांच्या डोक्याला काय शॉट देणार आहेत, हे लवकरच कळेल. चित्रपट तरुणाईचा असणार याबाबत शंका नाही, पण इतर वयोगटातील प्रेक्षकांसाठीही यात काही ना काही असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आता कुठे या चित्रपटाचा पहिला लुक समोर आला आहे. पुढे येणाऱ्या पोस्टर, टीझर आणि ट्रेलरवरून चित्रपटात नेमकं काय दडलंय याचा अंदाज बांधणं सोपं जाईल. तोवर 'वेट अँड वॅाच...'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा