Advertisement

वडील-मुलाच्या नात्याचा "हळवा कोपरा..."


वडील-मुलाच्या नात्याचा "हळवा कोपरा..."
SHARES

वडील आणि मुलातलं नातं अव्यक्त असतं. या अव्यक्त नात्याला शब्दांतून मांडत या नात्याची हळवी कहाणी आता गीतरुपानं प्रेक्षकांपुढे आली आहे. जितेंद्र जोशीचे शब्द, शैलेंद्र बर्वेचं संगीत आणि अवधूत गुप्ते, बेला शेंडे, राशी हरमळकरचा आवाज असा योग "एक सांगायचंय... Unsaid Harmony" या चित्रपटात जुळून आला आहे.


'हळवा कोपरा... कोणता'

'हळवा कोपरा तुझा कोणता सांग ना' असे शब्द असलेलं हे गीत वडील मुलाच्या नात्यातली अव्यक्त भावना नेमक्या शब्दांत व्यक्त करतात. सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे. लोकेश गुप्तेनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह लेखन, संकलनही केलं आहे. तर चैत्राली गुप्तेनं चित्रपटाच्या वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.


चित्रपटात 'यांच्या' भूमिका

"एक सांगायचंय... Unsaid Harmony" या चित्रपटात केके मेनन, राजेश्वरी सचदेव यांच्यासह पद्मावती राव, मिलिंद फाटक, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, शुभवी गुप्ते, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, हर्षिता सोहल, अजित भुरे आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत. ऑस्कर विजेत्या रेसूल पुकुट्टीनं चित्रपटाचं ध्वनी आरेखना केलं आहे, तर पुष्पांक गावडेनं सिनेमॅटोग्राफी केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा