Advertisement

‘काळजात घंटी’ वाजवणारं सुव्रत-प्राजक्ताचं गाणं

सचिन दरेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ या सिनेमातील एक रोमँटिक गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आलं आहे. ‘काळजात घंटी वाजते...’ असं या गाण्याचे बोल आहेत. या सिनेमात सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी यांची जोडी जमली आहे.

‘काळजात घंटी’ वाजवणारं सुव्रत-प्राजक्ताचं गाणं
SHARES

सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी हे छोट्या पडद्यावरील दोन लोकप्रिय कलाकार ‘पार्टी’ या आगामी मराठी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. लेखनाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या सचिन दरेकर दिग्दर्शित या सिनेमात ही जोडी प्रेक्षकांच्या ‘काळजात घंटी’ वाजवणार आहे.

सचिन दरेकर दिग्दर्शित ‘पार्टी’ या सिनेमातील एक रोमँटिक गाणं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आलं आहे. ‘काळजात घंटी वाजते...’ असं या गाण्याचे बोल आहेत. या सिनेमात सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी यांची जोडी जमली आहे. याशिवाय अक्षय टंकसाळे आणि मंजिरी पुपाला यांचीही जोडी यात आहे. या दोन जोड्यांसोबतच रोहित हळदीकर आणि स्तवन शिंदे यांनी साकारलेल्या मुख्य व्यक्तिरेखांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.

PARTY 01.jpg


सिनेमाची कथा?

मैत्रीचा हँगओव्हर चढवणाऱ्या या सिनेमातील चार मित्रांची आपापली गुलाबी दुनिया या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मित्रांच्या खासगी आयुष्यातील गुलाबी क्षणचित्रं मांडणाऱ्या या रॉमँटिक गाण्याचं लेखन गुरू ठाकूर यांनी केलं असून, अमितराजने संगीत दिलेल्या या गाण्याला स्वतः अमितराज आणि निहिरा जोशीने आवाज दिला आहे.

मैत्रीच्या धम्माल कट्ट्यावर आधारित असलेला ‘पार्टी’ हा सिनेमा प्रेक्षकांना आपल्या मित्राची आणि मैत्रिणीची आठवण करून देणारा ठरेल, असं मत चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केलं आहे. ७ सप्टेंबर हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा -

‘परी हूँ मैं’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा