Advertisement

ललितचा हा 'डान्स' पाहिला का?

मालिकांमध्ये लक्षवेधी अभिनय केल्यानंतर चित्रपटांकडे वळलेला अभिनेता ललित प्रभाकर सध्या 'स्माइल प्लीज' या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाच्या सेटवर 'डान्स पे चान्स...'च्या गाण्यावर बेधुंद होऊन नाचला.

ललितचा हा 'डान्स' पाहिला का?
SHARES

मालिकांमध्ये लक्षवेधी अभिनय केल्यानंतर चित्रपटांकडे वळलेला अभिनेता ललित प्रभाकर सध्या 'स्माइल प्लीज' या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाच्या सेटवर 'डान्स पे चान्स...'च्या गाण्यावर बेधुंद होऊन नाचला.


वेगळ्या रूपात

'चि. व चि. सौ. कां.', 'टीटीएमएम', 'हम्पी' आणि 'आनंदी गोपाळ' या चित्रपटांमध्ये झळकलेला ललित प्रभाकर आता 'स्माइल प्लीज' या मराठी चित्रपटात पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात समोर येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या विक्रम फडणीसनं ललितचं काम याआधी पहिलं होतं. तेव्हाच त्यानं आपल्या पुढच्या चित्रपटात ललितला पक्कं केलं होतं. आयुष्याकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघणारा, प्रत्येक क्षणाचा आनंद लुटणारा आणि व्यवसायाने ग्राफिक डिझायनर असणाऱ्या तरुणाची भूमिका 'स्माईल प्लीज' या चित्रपटात ललित साकारत आहे. 


गणपती मिरवणूकीचा सीन 

'आनंदी गोपाळ' या चित्रपटामध्ये साकारलेल्या  कणखर, कडक, शिस्तप्रिय अशा गोपाळरावांच्या भूमिकेच्या एकदम विरुद्ध अशी या चित्रपटातील ललितची भूमिका आहे. या निमित्तानं ललितला तो खऱ्या आयुष्यात जसा आहे, तशीच भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. चित्रीकरणादरम्यान ललित सिनेमाच्या सेटवर खूप धमाल, मजा, मस्ती करायचा. त्यातलाच एक किस्सा म्हणजे 'स्माईल प्लीज' चित्रपटात गणपती मिरवणूकीचा एक सीन आहे. सीन संपल्यावर, दिग्दर्शकानं ओके दिल्यानंतर ललित त्या मिरवणुकीत सामील झाला आणि मनसोक्त नाचला. 


१९ जुलैला प्रदर्शित

यात तो एकटाच नाचला नाही तर त्यानं सेटवरील सहकलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह सगळ्यांनाच नाचण्यास भाग पाडले आणि सेटवरील संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. त्यामुळं सगळ्यांचाच उत्साह द्विगुणित होऊन नव्या जोमानं परत सर्व कामाला लागले. या चित्रपटात ललित प्रभाकरसोबत मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगानं, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित 'स्माईल प्लीज' हा चित्रपट १९ जुलै रोजी संपर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


लिंक - https://p16studios.wetransfer.com/downloads/005487ee93242e0a6e8c742d6d773ce220190606070714/11a6d6ce00abbe7e63cd46daecbeb27e20190606070714/ef01a0




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा