Advertisement

वडील-मुलगी बनलेले हे कलाकार दिसणार प्रियकर-प्रेयसीच्या रूपात!

काही दिवसांपूर्वीच वडील-मुलीच्या भूमिकेत दिसलेले दोन कलाकार आता प्रियकर-प्रेयेसीच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची एक्सक्लुझीव्ह माहिती ‘मुंबई लाईव्ह’ला मिळाली आहे.हेही वाचा -

वडील-मुलगी बनलेले हे कलाकार दिसणार प्रियकर-प्रेयसीच्या रूपात!
SHARES

वास्तवातील नातेसंबंध कधी बदलत नाहीत, पण रुपेरी पडद्यावरील नातं मात्र सिनेमागणिक बदलत जातं. त्यामुळंच काही दिवसांपूर्वीच वडील-मुलीच्या भूमिकेत दिसलेले दोन कलाकार आता प्रियकर-प्रेयसीच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची एक्सक्लुझीव्ह माहिती ‘मुंबई लाईव्ह’ला मिळाली आहे.

‘सिनेमागणिक आॅनस्क्रीन बदलणारं नातं’ हे समीकरण हिंदी सिनेसृष्टीपासून प्रादेषिक भाषेतील सिनेसृष्टीपर्यंत सर्वच ठिकाणी लागू पडतं. ‘मोहब्बतें’ आणि ‘देवदास’ या सिनेमांमध्ये प्रियकर-प्रेयसीच्या रूपात दिसलेले शाहरूख खान आणि ऐश्वर्या राय-बच्चन ही जोडी मंसूर खान यांच्या ‘जोश’मध्ये भाऊ-बहिणीच्या रूपात दिसली होती. असंच काहीसं मराठी सिनेसृष्टीतही घडल्याचं प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषय हाताळले जात असतात. अशाच एका सिनेमात दोन कलाकारांचं बदललेलं नातं पहायला मिळेल.

दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांच्या ‘एक अलबेला’ या सिनेमात दिवंगत अभिनेते भगवानदादा यांच्या भूमिकेत थेट विद्या बालनसोबत जोडी जमवणारा मंगेश देसाई आता पुन्हा एकदा नव्या रूपात दिसणार आहे. ‘हजेरी’ असं शीर्षक असलेल्या या मराठी सिनेमात मंगेश उंदीर मारणाऱ्या तरुणाची भूमिका साकारत असून, या चित्रपटात त्याची लव्ह स्टोरी पहायला मिळणार आहे. झी टाकीजची निर्मिती असलेल्या आणि किशोर बेळेकरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘हजेरी’मध्ये मंगेशची नायिका बनली आहे तेजश्री प्रधान.

महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘जजमेंट’ या मराठी सिनेमातही मंगेश आणि तेजश्री एकत्र होते, पण… ‘जजमेंट’मध्ये जरी दोघांनी एकत्र काम केलं असलं तरी त्यांचं नातं वडील-मुलीचं होतं. मंगेशनं अत्याचारी पिता रंगवला होता, तर आपल्या आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पित्याला सजा देण्यासाठी तेजश्रीनं वकीलांचा काळा कोट परिधान केला होता. त्यामुळं ‘हजेरी’मध्ये दोघांचं नातं १८० डिग्री फिरलेलं पहायला मिळणार आहे. एकीकडं द्वेष आहे, तर दुसरीकडं प्रेम आहे.



हेही वाचा -

मराठीतील पहिलं थ्रीडी पोस्टर पाहिलं का?

या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा