Advertisement

आदिनाथ-उर्मिलाच्या मुलीचं नाव तुम्हाला माहितेय का?

उर्मिला आणि आदिनाथने आपल्या लाडक्या बाहुलीचं नाव 'जिजा' असं ठेवलं आहे. आदिनाथने सोशल मीडियावर जिजाच्या नावाची घोषणा केली. आदिनाथने आपल्या चिमुकलीचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोला जिजा आदिनाथ कोठारे असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

आदिनाथ-उर्मिलाच्या मुलीचं नाव तुम्हाला माहितेय का?
SHARES

उर्मिला कोठारेने जानेवारी महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिलाया नव्या पाहुणीच्या अगमनाने कोठारे कुटुंब प्रचंड खूष आहेआदिनाथ आणि उर्मिलाने आपल्या मुलीच्या आगमनाची जोरदार तयारी केली होतीनुकतंच या गोंडस मुलीचं बारसं मोठ्या उत्साहात पार पडलं.

उर्मिला आणि आदिनाथने आपल्या लाडक्या बाहुलीचं नाव 'जिजा' असं ठेवलं आहेआदिनाथने सोशल मीडियावर जिजाच्या नावाची घोषणा केलीआदिनाथने आपल्या चिमुकलीचे फोटोही शेअर केले आहेतया फोटोला जिजा आदिनाथ कोठारे असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

या आधी उर्मिलाने इंस्टाग्रामवर आपल्या मुलीची एक झलक तिच्या चाहत्यांना दाखवली होती.


आदिनाथ उर्मिलाची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

'शुभमंगल सावधान' हा उर्मिलाचा पहिला चित्रपटया चित्रपटात उर्मिला मुख्य भुमिकेत होतीमहेश कोठारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतंतर आदिनाथ या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक होताउर्मिलाला सेटवर पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होतायाच सेटवर त्यांच्यात चांगली मैत्री झालीत्यांनतर आदिनाथने पुण्यातील एका कॉफी शॉपमध्ये उर्मिलाला प्रपोज केलं११ डिसेंबर २०११रोजी हे दोघेही लग्नबंधनात अडकले.


आदिनाथ करणार धकधक गर्लसोबत काम

लवकरच आदिनाथ धकधक गर्ल माधुरीसोबत चित्रपटात झळकणार आहेआदिनाथने माधुरीसोबत सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहेहा फोटो शेअर करताना 'समथिंग न्यू आणि वर्किंग विथ लिजंड' असं कॅप्शनही दिलं आहेपण हा कोणता चित्रपट आहेत्यात कोण कोण कलाकार आहेत? या विषयी मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे.



हेही वाचा

उर्मिलाने शेअर केले तिच्या बेबीमूनचे फोटो!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा