Advertisement

अशी मृण्मयी कधी पाहिलीच नव्हती!

नेहमी एका सोज्वळ, साध्या भूमिकेत असणारी मृण्मयी देशपांडे. शिकारीमध्ये मृण्मयी एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

अशी मृण्मयी कधी पाहिलीच नव्हती!
SHARES

'एप्रिलमध्ये हीट वाढणार' म्हणत प्रदर्शित झालेला शिकारी चित्रपटाचा ट्रेलर आणि लक्ष्यवेधक पोस्टर यामुळे ‘शिकारी’ या चित्रपटाची रिलीज आधीच प्रेक्षकांमध्ये भलतीच चर्चा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून अनेक सरप्राईझ पॅकेज प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्यातलंच एक म्हणजे नेहमी एका सोज्वळ, साध्या भूमिकेत असणारी मृण्मयी देशपांडे. शिकारीमध्ये मृण्मयी एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.



मृण्मयीच्या आजवर गाजलेल्या भूमिका ह्या खूप सोज्वळ किंवा शहरी स्वरूपाच्या होत्या. पण शिकारीमधली भूमिका मृण्मयीसाठी आव्हानात्मक होती. सुरूवातीला मृण्मयी या भूमिकेला होकार देईल की नाही याबाबत शिकारीचे दिग्दर्शक स्वत: साशंक होते. मात्र, वेगळ्या धाटणीची भूमिका बघता मृण्मयीने लगेचच या भूमिकेसाठी होकार दिला.



'शिकारी'मध्ये काम करताना करताना मजा आली. ही वेगळी भूमिका आहे. या रोलमध्ये वेगळेपण होतं म्हणून मी हा रोल निवडला.

मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री


महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विजू माने यांनी केलं आहे. या चित्रपटाचे बोल्ड पोस्टर्स सर्वत्र झळकले आणि या चित्रपटाची चर्चा सुरु झाली. ‘अ लाफ रायट, अ सेक्स कॉमेडी विथ अ मेसेज’ असं म्हणत या पोस्टरने महाराष्ट्रभर धुडगूस घातला. नेहा खान ही मध्यवर्ती भूमिकेत या चित्रपटात आहे. त्याचबरोबर ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून घराघरात प्रवेश केलेल्या सुव्रत जोशीची यात खास भूमिका आहे. त्यासोबतच भाऊ कदम, भरत गणेशपुरे, वैभव मांगले, कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही भूमिका यात आहे.


हेही वाचा

‘शिकारी’च्या टीजरमध्ये नेहा खानचा बोल्ड अंदाज


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा