Advertisement

सोनाली कुलकर्णीनं वाढदिवशी दिली गोड न्यूज

गेले अनेक दिवस सोनाली कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाविषयी चर्चा सुरु होती. अखेर याबद्दल तिनं खुलासा केला आहे.

सोनाली कुलकर्णीनं वाढदिवशी दिली गोड न्यूज
SHARES

आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं तिच्या वाढदिवसादिवशीच चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गेले अनेक दिवस सोनाली कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाविषयी चर्चा सुरु होती. आज अखेर तिनं तिच्या लाईफ पार्टनरविषयी माहिती दिली आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या कुणाल बेनोडेकर याच्याशी २ फेब्रुवारीला सोनालीचा साखरपुडा झाला. याची अधिकृत घोषणा सोनालीनं केली आहे.

'आमचा २ फेब्रुवारी २०२० ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं...आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या,' अशी फेसबुक पोस्ट सोनालीनं लिहिली आहे.


दरम्यान, सोनाली कुलकर्णी हिच्या लग्नाविषयी याआधी अनेक अफवा पसरल्या होत्या. 'क्लासमेट्स' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सोनालीचं लग्न झालं अशा बातम्या खूप व्हायरल झाल्या होत्या. याबाबत सोनालीनं नुकताच खुलासा केला होता. ती म्हणाली की, सुरूवातीला चित्रपटाच्या सेटवर हा विषय गंमतीनं घेतला गेला. कोल्हापूरच्या एका मोठ्या राजकीय व्यक्तीशी तिचं लग्न झाल्याच्या बातम्या वेगानं पसरत होत्या. तिनं आधी दुर्लक्ष केलं पण जेव्हा तिच्या चुलत बहिणीनं तिला फोन करून तिला याबाबत विचारलं तेव्हा सोनालीच्या लक्षात आलं की ही साधी अफवा नाही आहे. अखेर आज या अफवांना सोनालीनं पूर्णविराम दिला.  



हेही वाचा

कुत्र्याच्या चाव्यामुळे 'या' अभिनेत्रीचा चेहरा बिघडला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा