Advertisement

कुत्र्याच्या चाव्यामुळे 'या' अभिनेत्रीचा चेहरा बिघडला

आता माझं आयुष्य पुन्हा कधीच पूर्वीसारखं होणार नाही अशी खंत तिनं व्यक्त केली.

कुत्र्याच्या चाव्यामुळे 'या' अभिनेत्रीचा चेहरा बिघडला
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री सना मकबूल सध्या तिच्या आयुष्यातील कठिण परिस्थितीचा सामना करत आहे. दाक्षिणात्य सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या सना मकबुलसोबत नुकताच एक अपघात झाला आहे. तिच्या तोंडावर कुत्र्यानं चावा घेतल्यानं तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.


आता अभिनेत्रीनं सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत आपली शोकांतिका सांगितली आहे. सनानं स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट लिहून शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. सना अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. आता माझं आयुष्य पुन्हा कधीच पूर्वीसारखं होणार नाही अशी खंत सनानं तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये व्यक्त केली. तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करमाऱ्या चाहत्यांचे तिनं आभार मानले आहेत.

सनानं पोस्टमध्ये लिहिलंय की, 'डिअर ऑल, तुमच्या काळजीबद्दल धन्यवाद. मी लवकरच बरी होत आहे आणि ठीक आहे. मी अदृश्य झाले नाही. मला माहिती आहे की मी ही माहिती देण्यास थोडा उशीर करतेय, पण माझा अपघात झाला आहे. एक माणूस आणि अभिनेता म्हणून एखाद्याचा चेहरा खूप महत्वाचा असतो, कुत्र्याच्या चाव्यामुळे मला शस्त्रक्रिया करावी लागत आहे. एक मुलगी जी नेहमी प्राण्यांवर प्रेम करायची आता आयुष्यभर त्यांचा तिरस्कार करेल. आता आयुष्यभरासाठी हे व्रण माझ्या चेहऱ्यावर राहतील.

यासोबतच तिनं लिहलं की, या प्रसंगातून मी स्वतःला सावरत असले तरी मला आता जीवनाची भीती वाटू लागली आहे. आता माझ्या आयुष्यात पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. आता ते कधीच पूर्वीसारखं होऊ शकणार नाही आणि हेच माझं मानसिकरीत्या खच्चिकरण करत आहे. पण मला धैर्यानं जगावं लागले. जीवनात काहीतरी शिकवण्याचे स्वतःचे मार्ग असतात. show must go on.'

सनाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. त्यानंतर तिचे चाहते तिला पाठिंबा देत आहेत. सना मकबुलनं टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'अर्जुन', 'आदत' आणि 'कितनी मोहब्बत 2'मधून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे.



हेही वाचा

कोरोनामुळे कला विश्वातील 'रत्न' हरपले, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन

विद्या बालनचा चित्रपट 'शकुंतला देवी' अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार रिलीज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा