Advertisement

विनोदी मल्टीस्टार्स घालणार ‘वाघेऱ्या’चा धुडगूस!

या सिनेमाच्या पोस्टरवर एक गाव दिसतंय. त्याचबरोबर गॉगल घातलेली बकरी दिसतेय. बकरीचा हा अवतार बघूनच सिनेमा विनोदी असल्याचं लक्षात येतंय. तसंच पोस्टरवरील ‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव' या टॅॅगलाईनमुळे हा सिनेमा हस्याची मेजवानी असणार यात शंकाच नाही.

विनोदी मल्टीस्टार्स घालणार ‘वाघेऱ्या’चा धुडगूस!
SHARES

नावात जरी वाघ असला, तरी ‘वाघेऱ्या’ सिनेमा प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाला आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर सोशल साईटवर लाँच करण्यात आलं. वसुधा फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेला 'वाघेऱ्या' १८ मे ला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

या सिनेमाच्या पोस्टरवर एक गाव दिसतंय. त्याचबरोबर गॉगल घातलेली बकरी दिसतेय. बकरीचा हा अवतार बघूनच सिनेमा विनोदी असल्याचं लक्षात येतंय. तसंच पोस्टरवरील ‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव' या टॅॅगलाईनमुळे हा सिनेमा हस्याची मेजवानी असणार यात शंकाच नाही.

या सिनेमाचं लेखन तसेच दिग्दर्शन समीर अशा पाटील यांनी केलं आहे. मे महिन्याच्या कडक उन्हात हास्याचा थंडावा घेऊन येत असलेला हा वाघेऱ्या प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. कारण, मराठी चित्रपट सृष्टीतील मातब्बर आणि अनुभवी विनोदवीर पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणार आहेत.

प्रमुख भूमिका

किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या कलाकारांचा यात समावेश असून, हे सर्व मिळून काय धुडगूस घालणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'वाघेऱ्या' ही माझ्या आजोळी म्हणजे 'मावडी' ह्या गावी घडलेली घटना आहे. ९० च्या दशकात बालपणी घडलेल्या ह्या घटनेने आम्ही लोटपोट झालो होतो. आजही त्यावेळची सगळी पात्र त्या प्रसंगाचं कथाकथन करतात तेव्हा हशा फुटतो.

समीर पाटील, लेखक-दिग्दर्शक

हेही वाचा

आता मराठीत अनुभवा फॅमिली ड्रामा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा