प्रेक्षकांची 'विश' पूर्ण करणारी 'बकेट लिस्ट'!

बकेट लिस्ट म्हणजे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी लिस्ट. सई देशपांडे या मुलीची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या 'ती'ची ही कथा! वयाची २१ वर्ष पूर्ण होण्याआधीच सई देशपांडे हिचा एका अपघातात मृत्यू होतो. तिच्या मृत्यूनंतर ती अवयवदान करून ८ लोकांना नवीन आयुष्य देते. त्यातलीच एक मधुरा साने म्हणजेच माधुरी दीक्षित!

  • प्रेक्षकांची 'विश' पूर्ण करणारी 'बकेट लिस्ट'!
  • प्रेक्षकांची 'विश' पूर्ण करणारी 'बकेट लिस्ट'!
  • प्रेक्षकांची 'विश' पूर्ण करणारी 'बकेट लिस्ट'!
  • प्रेक्षकांची 'विश' पूर्ण करणारी 'बकेट लिस्ट'!
  • प्रेक्षकांची 'विश' पूर्ण करणारी 'बकेट लिस्ट'!
  • प्रेक्षकांची 'विश' पूर्ण करणारी 'बकेट लिस्ट'!
  • प्रेक्षकांची 'विश' पूर्ण करणारी 'बकेट लिस्ट'!
SHARE

बॉलिवूडची धकधक गर्ल..असंख्य चाहत्यांची धडकन...अर्थात माधुरी दीक्षित-नेने 'बकेट लिस्ट' या तिच्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार म्हटल्यावर त्याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं होतं. आणि अगदी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच चित्रपट तुमची बकेट लिस्ट पूर्ण करतो. मध्यांतरानंतर चित्रपट थोडा रेंगाळला असला, तरी 'बकेट लिस्ट' नक्कीच तुमचं मनोरंजन करेल.बकेट लिस्ट म्हणजे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी लिस्ट. सई देशपांडे या मुलीची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या 'ती'ची ही कथा! वयाची २१ वर्ष पूर्ण होण्याआधीच सई देशपांडे हिचा एका अपघातात मृत्यू होतो. तिच्या मृत्यूनंतर ती अवयवदान करून ८ लोकांना नवीन आयुष्य देते. त्यातलीच एक मधुरा साने(माधुरी दीक्षित). सईने केलेल्या हृदयदानामुळे मधुरा नवीन आयुष्य जगत असते. ज्या मुलीमुळे आपण आज जिवंत आहोत, तिच्या म्हणजेच सईच्या आई वडिलांना भेटायला मधुरा जाते. सईच्या बकेट लिस्टबद्दल मधुराला समजतं. त्यामुळे सईची बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा निर्णय मधुरा घेते.सईची ही बकेट लिस्ट पूर्ण करायला सईचे मित्र-मैत्रिणी मधुराला मदत करायला तयार होतात. मात्र सईचा सख्खा भाऊ सलील (सुमेध मुदगलकर) याला विरोध करतो. त्याचप्रमाणे मधुराचा नवरा मोहन (सुमीत राघवन) सुरूवातील या गोष्टीसाठी होकार देतो. मात्र, मधुराच्या तब्येतीचं कारण देत तो मधुराला बकेट लिस्ट पूर्ण करण्यापासून थांबवतो. आता सईच्या बकेट लिस्टमधल्या सगळ्या इच्छा मधुरा पूर्ण करणार का? हे कळण्यासाठी तुम्हाला 'बकेट लिस्ट' बघावाच लागेल.चित्रपटात माधुरी दीक्षित वगळता फार काही वॉव फॅक्टर नाहीयेत. मात्र मधुरा जेव्हा एकेक करून सईची बकेट लिस्ट पूर्ण करते, ते बघणं इंटरेस्टिंग आहे. मधुराचं बाईक शिकणं, पबला जाणं, चित्रपटात रणबीरची एन्ट्री तुम्हाला स्क्रीनशी खिळवून ठेवायला भाग पाडते. मात्र मध्यंतरानंतर चित्रपट चांगलाच ताणला गेला आहे. मलेशियात चित्रीत झालेलं मधुरा आणि सुमित यांच्यातील रोमॅन्टिक गाणं बघायला जरी छान वाटत असलं, तरी त्या गाण्याची खरंच गरज होती का? अशी शंका मनात येते.चित्रपटाचं दिग्दर्शन बऱ्याच अंशी यशस्वी झालं आहे असं म्हणावं लागेल. काही लांबलेल्या प्रसंगांना कात्री लावली असती, तर चित्रपट तिथे कंटाळवाणा वाटला नसता. मधुराचा पबमधला प्रसंग खूपच लांबलेला वाटतो. त्याचप्राणे मधुराच्या आईचीही बकेट लिस्ट पूर्ण करताना दाखवल्यामुळे चित्रपट उगाचच लांबला आहे.माधुरीने साकारलेल्या मधुरा साने या गृहिणीच्या भूमिकेतही तिचा ग्लॅमरसपणा लपत नाही. मात्र माधुरीने ही सरळ साधी गृहिणी चांगल्या प्रकारे साकारली आहे. चित्रपटातील माधुरीच्या अनेक अदा, तिचा शेवटचा डान्स लक्षात राहतो. माधुरीच्या तोडीस तोड काम केलंय ते सुमित राघवनने. माधुरीबरोबर काम करण्याचं दडपण सुमितच्या चेहऱ्यावर दिसत नाही. मधुरावर प्रेम करणारा मोहन सुमितने मस्त सादर केला आहे. त्याचप्रमाणे सुमेध मदगलकर, मधुराचे सासु- सासरे वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर यांच्याही भूमिका लक्षात राहतात. त्याचप्रमाणे सलील- सईच्या आईच्या भूमिकेत असणारी रेणिका शाहणे यांनी आपल्या व्यक्तीरेखेला योग्य न्याय दिला आहे.माधुरीला मराठी चित्रपटात बघण्याची तिच्या चाहत्यांची विश लिस्ट चित्रपट पूर्ण करतो. चित्रपटात माधुरी असल्यामुळे तुमचं लक्ष फार दुसऱ्या कोणाकडे जात नाही. या सगळ्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला बकेट लिस्ट बघावाच लागेल.
Movie - Bucket List

Actors - Madhuri Dixit-Nene, Sumeet Raghvan, Sumedh Mudgalkar, Renuka Shahane

Ratings - 3/5


संबंधित विषय
ताज्या बातम्या