भाऊचं 'व्हीआयपी गाढव' म्हणतंय ‘चला हवा येऊ द्या’

विनोदवीर भाऊ कदमचं ‘व्हीआयपी गाढव’ सध्या मराठी तिकीटबारीवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना एक वेगळाच भाऊ पहायला मिळत आहे.

SHARE

विनोदवीर भाऊ कदमचं ‘व्हीआयपी गाढव’ सध्या मराठी तिकीटबारीवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना एक वेगळाच भाऊ पहायला मिळत आहे.

मराठी सिनेमांमध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग केले जात असतात. यासोबतच सामाजिक विषयांवरही याद्वारे भाष्य करण्यात येतं. कल्पराज क्रिएशन निर्मित आणि संजय पाटील दिग्दर्शित ‘व्हीआयपी गाढव’ हा मराठी सिनेमाही अशाच एका मुद्द्याकडं लक्ष वेधून घेणारा आहे. दिग्दर्शक संजय पाटील यांनी या सिनेमात एक महत्त्वपूर्ण मुद्दा हसतखेळत मांडला आहे. डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्ना देवचके यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून, कथा देवचके यांनी लिहिली आहे.

मराठी सिनेमाला चित्रपटगृह मिळत नसल्याची बोंब कायम सुरू असते. सिनेमागृहांअभावी मराठी सिनेमे प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचत नाहीत, पण ‘व्हीआयपी गाढव’ या सिनेमाच्या बाबतीत तसं घडलं नाही. मागच्या शुक्रवारी केवळ एकच सिनेमा प्रदर्शित झाल्यानं आणि त्यापूर्वी दोन आठवडे एकही मराठी सिनेमा प्रदर्शित न झाल्यानं ‘व्हीआयपी गाढव’ला कोणत्याही मराठी सिनेमांचं आव्हान नव्हतं. हिंदी सिनेमांचीही फारशी चलती नसल्यानं बहुतेक ठिकाणी त्यांचे शो काढून ‘व्हीआयपी गाढव’ला देण्यात आल्याचं चित्र पहायला मिळालं.

 प्रदर्शित झाल्यापासून चार दिवसांमध्ये भाऊच्या ‘व्हीआयपी गाढव’नं सर्व चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक या ठिकाणी सिनेमा हाऊसफुल सुरु आहे. सिनेमाच्या हाऊसफुल पाट्या आणि प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादावर भाऊनं आपल्या भावना व्यक्त करत प्रतिक्रीया दिली आहे. तो म्हणाला की, आजपर्यंत प्रेक्षकांनी मला ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेम दिलं आहे. त्या स्टेजवर माझी ‘हवा’ असते, पण आता महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहांमध्ये 'व्हीआयपी गाढव'ची ‘हवा’ असल्याचा खूप आनंद आहे.हेही वाचा  -

स्वराज्यातील गुप्तहेर नऊ रूपांमध्ये देणार ‘फत्तेशिकस्त’

कंगनानंतर ही अभिनेत्री बनली 'झाशीची राणी'
संबंधित विषय
ताज्या बातम्या