Advertisement

‘बॉईज’ सिनेमाचा येणार सिक्वेल

‘आम्ही लग्नाळू...’ म्हणत सर्व किशोरवयीन मुलांना खूळ लावणारा विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ हा सिनेमा पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याच धम्माल मस्तीचा धुमाकूळ घेऊन येणारा हा ‘बॉईज २’, येत्या ५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

‘बॉईज’ सिनेमाचा येणार सिक्वेल
SHARES

मागील काही वर्षांपासून जगभरातील सिनेमांप्रमाणेच मराठीतही सिक्वेलचा ट्रेंड रुजला आहे. याच धर्तीवर आता ‘बॅाइज’ या गाजलेल्या मराठी सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘आम्ही लग्नाळू...’ म्हणत सर्व किशोरवयीन मुलांना खूळ लावणारा विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ हा सिनेमा पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याच धम्माल मस्तीचा धुमाकूळ घेऊन येणारा हा ‘बॉईज २’, येत्या ५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. नुकताच या सिनेमाचं टीझर पोस्टर सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आलं. ‘बॉईज २’चं दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केलं आहे.


कोण असतील कलाकार?

किशोरवयीन मुलांचं भावविश्व मांडणाऱ्या सुपरहिट ‘बॉईज’च्या या दुसऱ्या पर्वात कोणकोणते कलाकार असणार आहेत, हे अद्याप समजू शकलं नसलं तरी, सिनेमाच्या टीझर पोस्टरवरून हा सिनेमादेखील कम्प्लीट युथ एंटरटेनिंग असल्याचं लक्षात येतं. यापूर्वीच्या ‘बॉईज’ चित्रपटातल्या शाब्दिक कोट्यांची मज्जा ‘बॉईज २’ या सिनेमांतदेखील अनुभवता येणार आहे.

तीन मित्रांची रंजक दुनिया दाखवणाऱ्या, या सिनेमाच्या दुसऱ्या भागात नेमकं काय पाहायला मिळणार? याची उत्कंठा सर्वांनाच लागली असून, मोठ्या पडद्यावरील ‘बॉईज’च्या या पुनरागमनला सिनेचाहते कसा प्रतिसाद देतात? ते पाहायचं आहे.


हेही वाचा -

‘लेथ जोशी’ तैवान आणि रशिया महोत्सवात

संबंधित विषय
Advertisement