Advertisement

माधुरीच्या वाढदिवसानिमित्त 'हे' रोमँटिक गाणं प्रदर्शित

माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाचं अौचित्य साधून बकेट लिस्ट या चित्रपटातील 'तू परी' हे दुसरं रोमँटिक गाणं सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात आलं आहे.

माधुरीच्या वाढदिवसानिमित्त 'हे' रोमँटिक गाणं प्रदर्शित
SHARES

येत्या 25 मे रोजी प्रदर्शित होणारा 'बकेट लिस्ट' या मराठी चित्रपटातील 'होऊन जाऊ द्या!' या गाण्याच्या तुफान हवेनंतर माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाचं अौचित्य साधून या चित्रपटातील 'तू परी' हे दुसरं रोमँटिक गाणं सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात आलं आहे.


प्रेमाची नाती खुलणार

'बकेट लिस्ट' चित्रपटातील पहिल्या गाण्यात सर्व कलाकारांनी धरलेला नृत्याचा ताल आपल्या आकांक्षांना उजाळा देणारा ठरला. आता 'बकेट लिस्ट' चित्रपटातील 'तू परी' या गाण्यामुळे प्रेमाची नाती नव्याने उलगडताना बघायला मिळणार आहे.


ही रोमँटिक जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

कोट्यवधींच्या स्वप्नातील परी अर्थातच माधुरी दीक्षित आणि अभिनय, संगीत असो वा नृत्य आपल्या प्रत्येक कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडणारा अभिनेता सुमित राघवन ही चित्तवेधक जोडी या रोमँटिक गाण्यातून आपल्यासमोर येणार आहे.


हे गाणं म्हणजे...

माधुरीच्या वाढदिवसानिमित्त 'बकेट लिस्ट' चित्रपटातील प्रसारित करण्यात येणार 'तू परी' हे गाणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी पर्वणीच म्हणावं लागेल. 'तू परी' या गाण्याचं संपूर्ण शूटिंग मलेशिया येथील लंकावी येथे करण्यात आलं आहे. या गाण्यादारम्यान आपणांस लांकवी येथील अप्रतिम लोकेशन्स आणि सौंदर्यवती माधुरीच्या मोहक अदा तर सुमित राघवनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा - 

माधुरीसोबत करण जोहरही 'बकेट लिस्ट'मध्ये!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा