Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

महेश कंद यांच्या ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच

‘कंदील’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट १९व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पिफ) निवडला गेला आहे.

महेश कंद यांच्या ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच
SHARES

‘‘हातात घेऊन सपनाची भिंग निघाले बघाया सशाचे शिंग पोरांना चढली श्रीमंतीची झिंग’’ या वनलाईनवर आधारलेला एक नवा कोरा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

‘कंदील’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट १९व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (पिफ) निवडला गेला आहे. महेश कंद या नवोदित दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला ‘कंदील’ देश-विदेशातील सिनेमहोत्सवामध्ये हजेरी लावणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 एल. के. पिक्चर्स या बॅनरअंतर्गत निर्माते लक्ष्मण कंद, अभिजीत कंद आणि महेश कंद यांनी सोशल मीडियावर मोशन पोस्टर रिलीज करत ‘कंदील’ चित्रपटाची घोषणा केली आहे. 

आशा आणि निराशेच्या लाटेवर स्वार होऊन श्रीमंत होऊ पाहणाऱ्या स्लममधील ५ मुलांची अनोखी कथा ‘कंदील’मध्ये पहायला मिळणार आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टरला कंदीलाची पार्श्वभूमी असून, ५ तरूण दिसतात.

एका झाडाखाली असलेल्या दगडावर तीन तरूण बसलेले आहेत, चौथा तरूण झाडाला टेकून तर पाचवा हाताची घडी घालून जणू भविष्यावर नजर रोखून उभा आहे.

“श्रीमंत... श्रीमंत...’’ या गाण्याच्या (मुखडयाची) पार्श्वसंगीताची संगीतमय जोड या मोशन पोस्टरला देण्यात आली आहे. मोशन पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटात काहीतरी वेगळं आणि वर्तमान समाजव्यवस्थेवर मनोरंजन शैलीत भाष्य करणारं कथानक पहायला मिळणार याची जाणीव होते.

‘कंदील’चं दिग्दर्शन करणाऱ्या महेश कंद याचा इथवरचा प्रवास खूप संघर्षमय आहे. महेशनं कोणत्याही फिल्म स्कूलमध्ये ऑफिशियल शिक्षण घेतलेलं नाही. फिल्म फेस्टिव्हल, फिल्म क्लबमध्ये जाऊन सिनेमाचे तंत्र स्वतः आत्मसात केलं आहे.

महेशनं यापूर्वी चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून खूप काम केलं आहे. ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी सिनेमासाठी दिग्दर्शक मिलिंद उके यांना असिस्ट केलं आहे. बरीच वर्षे लेखक अमरजीत आमले यांच्या सान्निध्यात राहून महेशनं सिनेमाचे धडे गिरवले आहेत.

‘कंदील’मध्ये महेश कंद, लक्ष्मण साळुंके, विनोद खुरंगळे, मंदार फाकटकर, दिव्यराज ओव्हाळ, दिलीप अष्टेकर आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. अमरजीत आमले यांनी ‘कंदील’ची पटकथा लिहीली असून, महेश कंद आणि सुहास मुंडे यांच्या साथीनं त्यांनी गीतलेखनही केलं आहे.

राष्ट्रीय पारितोषिक विजेता साऊंड डिझायनर महावीर साबन्नावर याने साऊंड डिझाईन केलं आहे. सिनेमॅटोग्राफी प्रसाद मोरे यांनी केली असून प्रॉडक्शन मॅनेजरची जबाबदारी विनोद खुरंगळे यांनी सांभाळली आहे. निलेश रसाळ आणि दिनेश भालेराव यांनी संकलन केलं आहे.हेही वाचा

श्वेता तिवारीच्या नवऱ्याचा सोसायटीत ड्रामा, सीसीटीव्ही फूटेज आले समोर

कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताची मदत करा : अमिताभ बच्चन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा