Advertisement

श्वेता तिवारीच्या नवऱ्याचा सोसायटीत ड्रामा, सीसीटीव्ही फूटेज आले समोर

श्वेता तिवारीनं आपल्या सोसायटीमधला एक सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून शेअर केलं आहे.

श्वेता तिवारीच्या नवऱ्याचा सोसायटीत ड्रामा, सीसीटीव्ही फूटेज आले समोर
SHARES

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिचा पूर्वीचा पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. मुलगा रेयांश आपल्यासोबत राहावा, अशी अभिनवची इच्छा आहे, असं वृत्त काही माध्यमांत आलं आहे. श्वेता मात्र म्हणते, की रेयांशला अभिनव चांगल्या पद्धतीने सांभाळू शकणार नाही. त्याच्या सुरक्षिततेची चिंता श्वेताला आहे.

नुकतंच श्वेता तिवारीनं आपल्या सोसायटीमधला एक सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून शेअर केलं आहे. त्यात अभिनव श्वेताकडून रेयांशला ओढून घेत असल्याचं दिसून येत आहे. आसपासचे नागरिक मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.

श्वेता तिवारीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या सीसीटीव्ही फूटेजसोबत लिहिलं आहे की, 'आता सत्य पुढे आलंच पाहिजे. हे माझ्या अकाउंटवर जास्त काळ राहणार नाही. मी थोड्या वेळाने ते डिलीट करणार आहे. मी आता हे अशासाठी पोस्ट करत आहे, की सत्य पुढे यावं. माझा मुलगा अभिनवला का घाबरतो? त्याचं कारण पुढे आलं आहे.'

'या घटनेनंतर महिनाभर माझा मुलगा घाबरत होता. तो इतका घाबरलाय, की रात्री नीट झोपतही नाही. त्याचा हात दोन आठवडे दुखत होता. आता तो त्याचे वडील घरी आले तर किंवा त्यांची भेट झाली तरी घाबरतो. मी माझ्या मुलाला या मानसिक चिंतेला सामोरं जाऊ देणार नाही. मी त्याला शांत करण्यासाठी आणि खूश ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करीन. पण हा भयानक माणूस माझ्या मुलाच्या मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवतो आहे. हे दुर्वर्तन नाही, तर काय आहे? हे माझा सोसायटीचं सीसीटीव्ही फूटेज आहे,' असंही श्वेतानं पुढे लिहिलं आहे.

या प्रकरणात आता टिव्ही सेलिब्रिटंनी देखील उडी घेतली आहे. श्वेता तिवारीनं व्हिडिओ शेअर करताच अनेक सेलिब्रिटिंनी तिची बाजू घेतली. एकता कपूरनं यावर म्हटलं की, या माणसाला अटक का नाही करत? 

तर टीव्ही कलाकार करणवीर बोहरानं म्हटलं की, लवकरात लवकर तक्रार दाखल कर. मी समजू शकतो तू ज्या त्रासातून जातेस. तर विकास गुप्तानं म्हटलं की, आजूबाजूची लोकं तिच्या मदतीला पुढे का नाही येत आहेत? अशाप्रकारे अनेकांनी श्वेताची बाजू घेतली आहे.    



हेही वाचा

कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताची मदत करा : अमिताभ बच्चन

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा